‘ई-पॉस’वर अंगठा, कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:54 AM2021-05-05T04:54:29+5:302021-05-05T04:54:29+5:30

बीड : गोरगरीब, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्य वाटप शिधावाटप दुकानातून करण्यात ...

Thumbs up on e-pos, coronary risk increased | ‘ई-पॉस’वर अंगठा, कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता

‘ई-पॉस’वर अंगठा, कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता

Next

बीड : गोरगरीब, मजूर व आर्थिकदृष्ट्या दुर्बल शिधापत्रिकाधारकांना १ मे या महाराष्ट्र दिनापासून मोफत अन्नधान्य वाटप शिधावाटप दुकानातून करण्यात येत आहे; परंतु सध्याचा कोरोनाचा संसर्ग वाढत असून, ई-पॉसवर अंगठा घेऊन धान्य वाटप केले जात आहे. यामुळे दुकानदार, शिधापत्रिकाधारकांच्या जीवावर कोरोनाचा संसर्ग बेतण्याची शक्यता आहे.

रेशनवर प्रत्येक व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ३ लाख ८९ हजार ६५७ शिधापत्रिकाधारकांना त्याचा लाभ मिळणार आहे. तर, शेतकरी एपीएल या योजनेतील ५ लाख ४० हजार ५४७ लाभार्थ्यांना राज्याचे मोफत धान्य मिळणार नसल्याची माहिती आहे. ‘ब्रेक द चेन’अंतर्गत घातलेल्या कडक निर्बंधांमुळे मागील १५ दिवसांपासून अनेक व्यवसाय बंद आहेत. त्यातच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी १५ मेपर्यंत वाढवल्याने गरीब, मजूर वर्गांपुढील समस्या गंभीर झाल्या आहेत. कामधंदा बंद झाल्यामुळे गोरगरीब कार्डधारकांना किराणा भरता आलेला नाही. त्यामुळे मोफत अन्नधान्याचा लाभ घेण्यासाठी रेशन दुकानांवर गर्दी वाढणार आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडण्याची शक्यता आहे. दरम्यान, ई-पॉस मशीनवर प्रत्येक कार्डधारकांचा अंगठा घेऊन धान्य वितरण केले जाणार आहे. त्यातून कोरोना पसरण्याची भीतीही लाभार्थी व दुकानदारांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, दुकानदारांच्या मागण्यांकडे लक्ष देऊन अंगठा लावण्याऐवजी फोटो काढणे किंवा इतर उपायोजना करावी, अशी मागणी होत आहे, तर रेशन दुकानदारांनी १ मे पासून या मागणीसाठी संप पुकारला असून, मागणी पूर्ण होईपर्यंत धान्य वाटप न करण्याची भूमिका घेतली आहे.

जिल्ह्यातील रेशन कार्डधारक

९३०२०४

अंत्योदय अन्न योजना

४०२८८

प्राधान्य कुटुंब योजना

३४९३६९

शेतकरी एपीएल

५४०५४७

रेशन दुकानांवर लाभार्थ्यांनी घ्यावी काळजी

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. दरम्यान, रेशन दुकानावर गेल्यानंतर सामाजिक अंतर पाळावे, गर्दी न करता धान्य घ्यावे, जेणेकरून संसर्ग होणार नाही.

बाहेर फिरताना मास्क घालणे बंधनकारक आहे. त्यामुळे रेशन दुकानदारांनी व लाभार्थ्यांनीदेखील मास्कचा वापर करावा. त्यामुळे संसर्गापासून बचाव होईल.

रेशन दुकानदारांनी दुकानांवर सुरक्षेच्या दृष्टीने सॅनिटाझयर ठेवावे. जेणेकरून धान्य घेतल्यानंतर त्याचा वापर करण्यास नागरिकांना सांगावे. त्यामुळेदेखील फायदा होऊ शकतो.

रेशन दुकानदारांच्या मागण्या

रेशन दुकानदारांना ई-पॉस मशीनवर अंगठा लावल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे याला विरोध होत आहे, तसेच कोरोनाच्या काळातदेखील सेवा देत असल्यामुळे विमा कवच देण्याची शासनाकडे त्यांची मागणी आहे. या मागणीवर अद्याप निर्णय झालेला नसल्यामुळे ५ मे पर्यंत बंद पुकारण्यात आला आहे.

काळाबाजार होण्याची शक्यता

संचारबंदी लागू केल्यापासून व्यवसाय, उद्योग बंद आहेत. त्यामुळे मोफत धान्य मिळेल, अशी आशा असताना दुकानदारांनी बंद पुकारल्यामुळे धान्य दुकानात पडून आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय मात्र कायम असल्याचे चित्र आहे. अंगठा न लावण्याच्या मागणीमुळे मोठ्या प्रमाणात मोफतचे धान्य काळ्या बाजारात जाण्याची शक्यतादेखील वर्तवली जात आहे. गावातील नागरिकांनी याकडे लक्ष ठेवून किती धान्य आले व किती वाटप केले, याची माहिती घेणे गरजेचे आहे.

..

रेशन दुकानदारांनी पुकारलेल्या संपाच्या संदर्भात शासनस्तरावरून बोलणी सुरू आहे. जिल्ह्यातील दुकानदारांचीदेखील जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन धान्य वाटपासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल.

-मच्छिंद्र सुकटे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड.

===Photopath===

030521\03_2_bed_8_03052021_14.jpg

===Caption===

रेशन दुकान

Web Title: Thumbs up on e-pos, coronary risk increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.