गुंदा वडगाव, गोविंदवाडीत चोरांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:12 AM2019-03-03T00:12:36+5:302019-03-03T00:13:05+5:30

बीड तालुक्यातील गुंदा वडगाव व गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. माजी सैनिकाची बंदुकीसह एका शेतकऱ्याचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

Thunderstorms in Gunda Wadgaon, Govindwadi | गुंदा वडगाव, गोविंदवाडीत चोरांचा धुमाकूळ

गुंदा वडगाव, गोविंदवाडीत चोरांचा धुमाकूळ

Next
ठळक मुद्देखळबळ : माजी सैनिकाची बंदूक तर शेतकऱ्याचे पावणेदोन लाख लंपास; सर्वत्र भीतीचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड तालुक्यातील गुंदा वडगाव व गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे चोरट्यांनी शुक्रवारी रात्री धुमाकूळ घातला. माजी सैनिकाची बंदुकीसह एका शेतकऱ्याचे तब्बल पावणेदोन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या चोऱ्यांमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी येथे श्रीकिसन राम कदम या शेतकºयाच्या घराचा कडीकोंडा तोडून चोरटे घरात शिरले. कपाट तोडून रोख १ लाख, एक मोबाइल व दागिने असा पावणे दोन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. हा प्रकार सकाळी समजला. कदम यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. गेवराई ठाण्यात गुन्हा नोंद असून तपास फौजदार विठ्ठल काळे करत आहेत. त्यानंतर गोविंदवाडीत पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख फौजदार रामकृष्ण सागडे यांनीही भेट दिली.
दुसरी चोरी गुंदा वडगाव येथे घडली. किसनदेव लक्ष्मण डोंगरदिवे या माजी सैनिकाच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला. ८ दिवसांपासून गावाकडील घराला कुलूप लावून ते बीडमध्ये राहत होते. चोरांनी बंद घर हेरुन शुक्रवारी मध्यरात्री कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांच्या हाती त्यांची बंदूक लागली. त्यातील काडतूस डोंगरदिवे यांच्याकडे होते. त्यामुळे रिकामी बंदूक घेऊन चोरांनी पळ काढला. तसेच याच गावातील दादासाहेब रामकिसन मुंडे यांच्या घरात चोरी केली. कुटूंबीय झोपलेल्या खोलीला बाहेरून कड्या लावत चोरट्यांनी दुसºया खोलीत ठेवलेला जवळपास ५३ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पहाटे दीड वाजता पिंपळनेर ठाण्याचे सहायक निरीक्षक श्रीकांत उबाळे, सहायक फौजदार एस. आर. बळवंते, पोहेकॉ बालासाहेब सुरवसे, एस. पी. खरमाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी गुन्हा नोंद असून तपास फौजदार श्रीराम काळे करत आहेत.
जिल्ह्यात चोरटे पुन्हा सक्रीय; पोलीस अपयशी
मागील काही दिवसांत चोºया कमी झाल्या होत्या. मात्र पुन्हा एकदा चोरटे जिल्ह्यात सक्रीय झाले आहेत.
माजलगावात धुमाकूळ घातल्यानंतर आता गेवराई आणि बीड तालुक्यात चोºया वाढल्या आहेत.
याचे तपास मात्र लावण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Thunderstorms in Gunda Wadgaon, Govindwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.