ज्वारी काढणीला सुरुवात; मजुरीचे दर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 11:59 PM2020-02-16T23:59:03+5:302020-02-16T23:59:56+5:30
आष्टी : सतत कायम दुÞष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकरी अल्प पाण्यावर येणारे ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. गतवर्षी सतत ...
आष्टी : सतत कायम दुÞष्काळी असणाऱ्या आष्टी तालुक्यातील शेतकरी अल्प पाण्यावर येणारे ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. गतवर्षी सतत पडणारा पाऊस, लष्करी अळीचे आक्रमण,ढगाळ वातावरण यांचा ज्वारीच्या पिकावर विपरीत परिणाम झाल्याने उत्पादनात घट आली आहे. सध्या ज्वारीच्या काढणीला सुरूवात झाली, असून उत्पादनात झालेली घट व मजुरांचे गगनाला भिडलेले दर यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जास्त दराने रोजंदारी देऊनही मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र दिसून येत आहे.
उत्पादन घटण्याची कारणे
आष्टी तालुक्यात गत वर्षी रब्बीच्या पिकांसाठी आवश्यक पाऊस पडला. काही भागात जोरदार, तर काही भागात पेरणी योग्यच पाऊस पडला. ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर झाल्या. सुरूवातीला पावसाने ज्वारीचे पीक जोमात वाढले. ज्वारीवर लष्करी अळीचे आक्रमण, चिकटा, ढगाळ वातावरणामुळे पिकाच्या उत्पादनात घट झाली.
शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत
रबी हंगामातील ज्वारीचा पीकविमा कंपनीने भरून घेतला नाही. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी " ८ हजार मदत जाहीर केली होती परंतु ती अद्याप शेतक-यांना मिळालेली नाही.