व्यापाऱ्यांवर लाॅकडाऊनमुळे उपासमारीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:33 AM2021-04-16T04:33:52+5:302021-04-16T04:33:52+5:30
माजलगाव : अत्यावश्यक सोडून इतर व्यापारी बांधवांवर लाॅकडाऊनमुळे प्रंचड संकट आले आहे. त्यामुळे गुरुवारी येथील व्यापारी संघटनेने शिवशाही भोजनाची ...
माजलगाव : अत्यावश्यक सोडून इतर व्यापारी बांधवांवर लाॅकडाऊनमुळे प्रंचड संकट आले आहे. त्यामुळे गुरुवारी येथील व्यापारी संघटनेने शिवशाही भोजनाची थाळी घेऊन गांधीगिरी आंदोलन करून शासनाचा निषेध व्यक्त केला.
मागील वर्षभराच्या काळात कोरोनामुळे वारंवार लाॅकडाऊन लावण्यात आले. या दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या काळात बोटावर मोजण्याइतक्या दुकान मालकांनी एक-दोन महिन्याचाच किराया माफ केला होता. यामुळे व्यापारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची खूप मोठी आर्थिक हानी झाली होती.
मागणी काही दिवसांपासून जिल्हाधिकारी व महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊन लावले. या लाॅकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. यापूर्वीच आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे माजलगाव तालुका व्यापारी महासंघाच्या पुढाकाराने गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सर्व व्यापाऱ्यांनी मोफत शिवभोजन चालू असलेल्या ठिकाणी जाऊन शिवभोजन थाळी घेत गांधीगिरी आंदोलन करीत शासनाचा निषेध व्यक्त केला.
या आंदोलनात व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेंद्र रेदासनी व महासचिव सुनील भांडेकर, गणेश लोहिया, मोहन घुले, शेख बाबर, संजय पोहरे, दिलीप ललवाणी, टिल्लू लड्डा, विपीन नावंदर, बालू वागीकर, आकाश गडम, विष्णू चिचपूरकर, नारायन गंड्डे, आळने, सर्जेराव झगडे व न्हावी संघटनेचे अध्यक्ष सोमेश्वर झगडे व पदाधिकारी उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी मोफत असलेल्या शिवभोजन थाळी घेतली. मात्र, या ठिकाणी शिवभोजन थाळी घेण्यासाठी आलेल्या अत्यंत गरजू व्यक्तींना ही थाळी संपल्यामुळे अनेकांना परत जाण्याची वेळ आली. व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेकांना उपाशी राहण्याची किंवा महागाचे अन्न विकत घ्यावे लागल्याने त्यांचा व्यापाऱ्यांविरुद्ध रोष निर्माण झाला होता.
===Photopath===
150421\purusttam karva_img-20210415-wa0048_14.jpg