लोककलावंतावर उपासमारीची वेळ सरकारकडून केवळ नावाला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:34 AM2021-08-15T04:34:49+5:302021-08-15T04:34:49+5:30
बीड : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न प्रशासनापर्यंत मांडण्याचे अनमोल असे कार्य करणारे तसेच मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांवर कोरोनामुळे उपासमारीची ...
बीड : बोलीभाषेतून समाजाचे प्रश्न प्रशासनापर्यंत मांडण्याचे अनमोल असे कार्य करणारे तसेच मनोरंजन करणाऱ्या लोककलावंतांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. राज्य शासनाकडून मानधन देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अनेकांच्या खात्यावर रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे मोलमजुरी करून लोककलावंत उदरनिर्वाह करत आहेत. दरम्यान, जे मानधन दिले जाते ते अतिशय कमी असल्यामुळे त्यामध्ये वाढ करण्याची व पुन्हा एकदा नोंदणी कार्यक्रम हाती घेण्याची मागणी लोककलावंतांकडून होत आहे.
राज्य सरकारची मदत कधी मिळणार?
५० वर्षे पूर्ण झालेल्या कलावंतांना २२५० रुपये जाहीर झाले आहेत.
ज्यावेळेस यासाठी शासनाकडून पैसे दिले जातील त्यावेळी लोककलावंतांच्या खात्यावर ही मानधन रक्कम जमा केली जाईल.
अनेक वेळा वेळेवर मदत मिळत नसल्यामुळे त्याचा उपयोग होत नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
मदत हातात किती उरणार?
कोरोनाने लोककलावंतांचे कार्यक्रम थांबवले आहेत. त्यातून कलावंत अडचणीत आले आहेत.
पूर्वी क वर्गातील लोककलावंतांना १५०० रुपये मानधन मिळत होते. आता त्यामध्ये वाढ होऊन २२५० रुपये मिळत आहेत.
ही मदत काही मोजक्याच लोकांना मिळत आहे. त्यामुळे शेकडो कलाकार अजूनही उपेक्षित आहेत.
दरवर्षी फक्त ६० जणांची होते निवड
दरवर्षी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कलावंतांची निवड केली जाते. राष्ट्रीयस्तरावरील कलावंतांना अ दर्जा राज्यस्तरावरील ब दर्जा व स्थानिकस्तरावर क दर्जा दिला जातो.
प्रत्येक वर्षी केवळ ६० लोकांची निवड होते. या निवडीसाठी जवळपास १५०० अर्ज येतात. त्यातून ६० जण निवडले जातात.
लोककलावंतांची अवस्था फार वाईट झाली आहे. अनेक जण शेतमजुरी करून संसार चालवत आहेत. तर, घरच्या महिला भांडे-धुणे करण्यासाठी जात आहेत. त्यामुळे शासनाने नोंदणी नसलेल्या लोककलावंतांनादेखील आर्थिक मदत करावी.
भानू वासुदेव
गत दोन वर्षांपासून लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न आहे. कामो बंद आहेत, त्यामुळे उपासमारीची वेळ आली असून, विविध प्रकारची मोलमजुरीची कामे करावी लागत आहेत.
राजन गोसावी
बँडबाजा बंद आहे, त्यामुळे पथकातील सर्व जण मजुरी करत आहेत. शेतातील कामे करून मिळेल त्या पैशाने संसार चालवत आहोत. त्यामुळे आम्हाला परवानगी द्यावी.
अंगद पाटुळे
140821\14_2_bed_14_14082021_14.jpg
बॅंड पथकातील अंगद पाटुळे आपले साहित्य दुरुस्त करताना दिसत आहेत.