शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 05:59 PM2023-05-31T17:59:17+5:302023-05-31T17:59:58+5:30

वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही.

Tired of the government's policy, the farmer cuts the lemon trees ! | शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकऱ्याने केली लिंबोणीची बाग भुईसपाट !

googlenewsNext

- पुरूषोत्तम करवा
माजलगाव :
शासनाने फळबाग नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे शासनाच्या उदासीन धोरणाच्या विरोध करण्यासाठी माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी येथील शेतकऱ्याने अडीच एक्कर लिंबोणीची बाग भुईसपाट केली.

माजलगाव तालुक्यातील मोठीवाडी येथील शेतकरी रामभाऊ नारायण गोले  यांच्या कुटुंबांनी गेल्या दहा वर्षापुर्वी लिंबोणीची बाग लावली. गेल्या दहा वर्षांत सांभाळ करून बाग मोठी केली. परंतु, गेल्या तीन वर्षांपासून अस्मानी संकटाने बागेचे मोठे नुकसान झाले. मात्र, शासनाने कधीही नुकसान भरपाई दिली नाही. तसेच फळबागांचे बिट चालू करण्याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने अनेक आंदोलने करुनही बाजार समितीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे नाईलाजाने खाजगी बिटात दहा टक्के कमिशन देऊन लिंबु विक्री केली, यातून नगण्य उत्पन्न होत असल्याने शेतकरी हतबल आहेत. 

दरम्यान, एप्रिल महिन्यात वादळवाऱ्याने प्रचंड नुकसान झाले. बागेतील झाडे उन्मळून पडली. तहसीलदरांचा पंचनामा झाला पण नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांना निवेदन देऊन २७ मे पर्यंत नुकसान भरपाई न दिल्यास लिंबोणीची बाग तोडण्याचा करण्याचा इशारा दिल्यानंतरही शासनाने काहीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आज शासनाच्या धोरणाला कंटाळून शेतकरी रामभाऊ नारायण गोले याने अडीच एकरवरील लिंबोणीची बाग तोडली. तसेच ३ जुन रोजी दुपारी १२ वाजता याच लिंबोणीच्या झाडाचे सरण रचून आत्मदहन करण्याचा इशारा शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने ॲड.नारायण गोले यांनी दिला आहे.

Web Title: Tired of the government's policy, the farmer cuts the lemon trees !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.