थकित वेतनासाठी हिवताप निर्मूलन कर्मचाऱ्यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:42 AM2018-12-14T00:42:37+5:302018-12-14T00:43:23+5:30
मागील काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचाºयांचे वेतन थकले आहे. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील कर्मचाºयांनी आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : मागील काही महिन्यांपासून येथील नगरपालिकेतील मलेरिया विभागातील कर्मचाºयांचे वेतन थकले आहे. यासंदर्भात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदरील कर्मचाºयांनी आंदोलन केले.
बीड न.प.मधील मलेरिया विभागातील कर्मचाºयांचे मागील १७ महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. त्यामुळे विभागातील कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक वेळा मागणी करुन देखील वेतन न मिळाल्यामुळे कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन करण्याचा इशारा मागील काही दिवसांपूर्वी दिला होता. मात्र तरी देखील न.प.च्या वतीने कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन केले. तसेच तात्काळ वेतन देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाºयांकडे करण्यात आली.
यावेळी आर.डी.भोकरे, आर.जी अंकुटे, शेख शहिमोदीन, शाहूराव वाघमारे, एल.के.सानप, के.व्ही. सुरवसे, वी.एस. इंगळे, यांच्यासह मलेरिया विभागातील इतर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.