बीड जिल्हा शल्यचिकित्सकाच्या नियूक्तीचा आदेश बदलण्याच्या मुंबईतून हालचाली

By सोमनाथ खताळ | Published: August 6, 2022 05:32 PM2022-08-06T17:32:31+5:302022-08-06T17:33:54+5:30

इच्छूकांचे मुंबईत ठाण : माता व बालसंगोपन अधिकारीही रूजू नाही

to change appointment of Beed District Surgeon many tries from Mumbai | बीड जिल्हा शल्यचिकित्सकाच्या नियूक्तीचा आदेश बदलण्याच्या मुंबईतून हालचाली

बीड जिल्हा शल्यचिकित्सकाच्या नियूक्तीचा आदेश बदलण्याच्या मुंबईतून हालचाली

Next

- सोमनाथ खताळ
बीड :
येथील जिल्हा शल्य चिकित्सक या पदावर नाशिकमधील लासलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सतीश सुर्यवंशी यांची नियूक्ती शुक्रवारी झाली होती. परंतू हे आदेश बदलण्याच्या हालचाली गतीने सुरू आहेत. इच्छूक अधिकारी मुंबईत ठाण मांडून आहेत. तर दुसऱ्या बाजूला माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.बालन शेख हे देखील अद्याप रूजू झालेले नाहीत. त्यांच्या नियूक्तीचा आदेशही चार दिवसांपूर्वीच निघालेला आहे.

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक पद हे मागील १३ महिन्यांपासून रिक्त होते. माजलगावचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. परंतू शुक्रवारी लासलगाव येथील डॉ.सतीश दयाराम सूर्यवंशी यांची या पदावर नियूक्ती झाली. त्यांच्याकडून आठवडाभरात पदभार स्विकारणार असे सांगण्यात आले असले तरी हा आदेश बदलण्याच्या हालचाली मुंबईतून सुरू झाल्या आहेत. बीडच्या पदासाठी इच्छूक असलेले अधिकारी मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यामुळे सोमवारी अथवा मंगळवारपर्यंत याचा अंतीम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

बागल शेख बीडला येण्यास अनुत्सूक
बीडचे माता व बालसंगोपन अधिकारी हे पद मागील अनेक वर्षांपासून रिक्त आहे. मागील वर्षी पूण्यातील एका महिला डॉक्टरची नियूक्ती झाली होती. परंतू त्यांनी ऐनवेळी बीडला येण्यास नकार देत नियूक्तीचे ठिकाण बदलून घेतले. त्यामुळे या पदाचा अतिरिक्त कारभार गेवराईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांच्याकडे सोपविला. आता नांदेडमधील नायगावचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बागल शेख यांनी २ ऑगस्ट रोजी नियूक्ती झाली. परंतू ते देखील अद्याप रूजू झालेले नाहीत. त्यांना नांदेड जिल्ह्यात पोस्टींग हवी आहे. तर उस्मानाबादला पोस्टींग मिळालेले डॉ.गंडाळ हे बीडसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे यातही बदल होण्याची शक्यता आहे. हे दोघेही रूजू झाले नाहीत तर डॉ.कदम हेच पुन्हा एकदा प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत.

Web Title: to change appointment of Beed District Surgeon many tries from Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.