लाच घेताना अव्वल कारकून चतुर्भुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:37 AM2021-02-09T04:37:07+5:302021-02-09T04:37:07+5:30
आष्टी : तालुक्यातील बेलगांव येथील रेशन दुकानदाराकडून परवाना नूतनीकरणासाठी पाच हजारांची लाच घेताना, आष्टी तहसीलमधील पुरवठा विभागाचा अव्वल कारकून ...
आष्टी : तालुक्यातील बेलगांव येथील रेशन दुकानदाराकडून परवाना नूतनीकरणासाठी पाच हजारांची लाच घेताना, आष्टी तहसीलमधील पुरवठा विभागाचा अव्वल कारकून अजिनाथ बांदल यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.
आष्टी तहसील कार्यालयाकडून दरवर्षी पुरवठा विभागाकडून सर्व रेशन दुकानदारांचे परवाने नूतनीकरण करण्यात येते. बेलगांव येथील स्वस्त धान्य दुकानदाराला त्याच्या परवान्याचे नूतनीकरण करावयाचे होते. या कामासाठी पुरवठा विभागातील अव्वल कारकून अजिनाथ बांदल याने पैशाची मागणी केली होती. त्यामुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, ८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात सापळा लावला. दुपारी पाचच्या दरम्यान अजिनाथ बांदल याला लाच घेताना रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधीक्षक बाळकृृृृृष्ण हानपुडे पाटील यांच्यासह पोलीस अंमलदार अमोल बागलाने, सखाराम घोलप, विजय बरकडे, चालक संतोष मोरे यांच्या पथकाने कारवाई केली.