धारूरच्या गुंडाची हर्सूलमध्ये रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:18 AM2018-10-07T00:18:37+5:302018-10-07T00:19:24+5:30
धारूर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या कृष्णा राजपाल उकांडे (२५ रा. धारूर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी हे आदेश काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : धारूर तालुक्यात दहशत निर्माण करणाऱ्या कृष्णा राजपाल उकांडे (२५ रा. धारूर) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्याची औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शनिवारी हे आदेश काढले.
जबरी चोरी करणे, जुगार खेळणे-खेळविणे, दरोडा टाकणे, रस्ता अडविणे, शिवीगाळ करणे, दुखापत करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, दंगा करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे यासारखे गुन्हे करण्यात कृष्णा तरबेज होता. हाच धागा पकडून धारूरचे पोलीस निरीक्षक मोरे यांनी त्याचा एमपीडीए प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. यावर जिल्हाधिकाºयांनी तात्काळ कारवाई केली. त्याप्रमाणे त्याला अटक करून शनिवारी सकाळीच त्याची हर्सूलमध्ये रवानगी केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. मोरे व त्यांच्या पथकाने केली.
कारवायांची हॅटट्रिक
येणाºया नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कारवायांचा बडगा उगारला जात आहे. चालू आठवड्यात तीन गुंडांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांची हर्सूल कारागृहात रवानगी केली आहे. कृष्णावर कारवाई करून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी आठवड्यात कारवायांची हॅटट्रिक पूर्ण केली आहे.