शौचास गेलेल्या महिलेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:34 AM2021-05-18T04:34:11+5:302021-05-18T04:34:11+5:30
कडा (जि. बीड) - चाळीसवर्षीय महिला घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेतात शौचास गेली असता, पाळत ठेवून बसलेल्या सोलेवाडी येथील ...
कडा (जि. बीड) - चाळीसवर्षीय महिला घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या शेतात शौचास गेली असता, पाळत ठेवून बसलेल्या सोलेवाडी येथील दोघाजणांनी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना शनिवारी पहाटे तालुक्यातील एका गावात घडली.
अवघ्या दोन तासांत आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांना आष्टी पोलिसांनी अटक केली.
ही महिला शनिवारी पहाटे साडेतीन-चारच्यासुमारास घरापासून जवळच असलेल्या शेतात शौचास गेली असता, पाळत ठेवून बसलेल्या सोलेवाडी येथील दोघांनी तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून रविवारी रात्री आष्टी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे करीत आहेत.
गुन्हा दाखल होताच अवघ्या दोन तासांत आरोपीच्या आवळल्या मुसक्या
शनिवारी घडलेल्या घटनेची रविवारी रात्री पीडित महिलेने आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे व त्याच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक योगेश कोरडे, पोलीस शिपाई राऊत, वाणी यांनी ही कारवाई करत आरोपींना अटक केली.