माजलगावात अँँटिजन टेस्टला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:43+5:302021-03-15T04:29:43+5:30

माजलगाव : आठ दिवसांपूर्वी अँँटिजन टेस्टबाबतीत उदासीन असलेल्या व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून आपली भूमिका बदलत कोरोना चाचणीला चांगला ...

Traders respond to antigen test in Majalgaon | माजलगावात अँँटिजन टेस्टला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

माजलगावात अँँटिजन टेस्टला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

googlenewsNext

माजलगाव : आठ दिवसांपूर्वी अँँटिजन टेस्टबाबतीत उदासीन असलेल्या व्यापाऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून आपली भूमिका बदलत कोरोना चाचणीला चांगला प्रतिसाद दिला. रविवारी ४ वाजेेेपर्यंत तीन केंद्रांवर २९५ अँँटिजन टेस्टमध्ये १२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे आठवडाभरात झालेल्या १०९५ जणांच्या चाचणीत ५८ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश देऊनही माजलगाव शहरात व्यापाऱ्यांची अँँटिजन टेस्ट बाबतीत उदासीनता दिसून येत होती; परंतु गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात अँँटिजन टेस्ट बाबतीत निर्बंध जिल्हा प्रशासनाने कडक केले. माजलगाव शहरात गणपती मंदिर, सोळंके महाविद्यालय, शासकीय कोविड सेंटर या ठिकाणी या टेस्ट सुरू आहेत. शहरात अधिकृत व्यापाऱ्यांची संख्या सोळाशेच्या आसपास असून इतर नोंदणी नसलेले व्यापारी जवळपास तीनशे इतके आहेत. एकूण १९०० व्यापाऱ्यापैकी शनिवारपर्यंत ७४५ लोकांच्या अँँटिजन टेस्ट झाल्या आहेत.यात ४६ जण पॉझिटिव्ह आढळून आले तर रविवारी सकाळपासून सुरू असलेल्या गणेश मंदिरात २९५ टेस्टपैकी १२ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोळंके महाविद्यालयात ३१ लोकांच्या टेस्टपैकी ५ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तसेच कोव्हिड केअर सेंटरमध्ये ५६ व्यापाऱ्यांच्या अँँटिजन टेस्ट झाल्या. एकूण १०९५ व्यापाऱ्यांच्या आठवडाभरात अँँटिजन टेस्ट झाल्या. त्यात एकूण ५८ जण पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. सर्व चाचणी केंद्रांवर व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष सुरेश रेदासनी, गणेश लोहिया तहसीलदार वैशाली पाटील व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांनी भेट देऊन पाहणी केली.

===Photopath===

140321\purusttam karva_img-20210314-wa0028_14.jpg

===Caption===

माजलगावात कोरोना चाचणीसाठी तीन केंद्रांवर व्यापाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: Traders respond to antigen test in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.