माजलगावात व्यापारी करणार होडी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:23 AM2021-07-16T04:23:48+5:302021-07-16T04:23:48+5:30

आमदार, नगराध्यक्ष, सभापती, मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही मार्ग निघेना माजलगाव : शहरातील मोंढ्यात जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ तब्बल एक वर्षापासून नालीचे ...

Traders will launch boat agitation in Majalgaon | माजलगावात व्यापारी करणार होडी आंदोलन

माजलगावात व्यापारी करणार होडी आंदोलन

Next

आमदार, नगराध्यक्ष, सभापती, मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही मार्ग निघेना

माजलगाव : शहरातील मोंढ्यात जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ तब्बल एक वर्षापासून नालीचे पाणी, पावसाचे पाणी साचत असल्याच्या तक्रारी करून व्यापाऱ्यांनी अनेक आंदोलने केली. आमदार, नगराध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, मुख्याधिकाऱ्यांकडे प्रत्यक्ष भेटून तक्रारी केल्या, तरी यांना कसलेच सोयरसुतक नसल्याचे दिसून आल्याने संतप्त व्यापारी आता होडी आंदोलन करणार आहेत.

शहरातील मोंढ्यात जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक वर्षांपासून नालीचे, तसेच पावसाचे पाणी साचल्याने व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पाणी साचल्याने ग्राहकांना या रस्त्याने चालणे मुश्कील झाल्याने एक वर्षांपासून या भागातील दुकानांवर खूप मोठा परिणाम झाला आहे. या पाण्यामुळे त्रास होत असल्याने व्यापाऱ्यांनी अनेक आंदोलने केली. प्रसंगी पाण्यात बसून व्यापाऱ्यांनी आंदोलने केली. तरी येथील आमदार, नगराध्यक्ष, सभापती, मुख्य अधिकाऱ्यांना कहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून आले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्न पडल्याने शेवटी पुन्हा एकदा होडी आंदोलन करण्याचा इशारा मोंढा भागातील व्यापाऱ्यांनी केला आहे.

-----

गोडबोले आश्वासन

मुख्याधिकाऱ्यांना नाही काही घेणेदेणे

सध्या शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून, नाल्या तुंबल्याने गल्लोगल्ली व मोंढा भागात पाणी साचल्याने नागरिकांना जाणे अवघड झाले आहे. मोंढ्यात मागील एक वर्षापासून पाणी साचत असताना व व्यापाऱ्यांनी पाण्यात आंदोलन केले असताना येथील मुख्याधिकारी हे केवळ उद्या पाणी काढून द्यायला सांगतो, असे मधुर भाषेत सांगत वेळ मारून नेतात, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे.

140721\2020purusttam karva_img-20210714-wa0019_14.jpg

Web Title: Traders will launch boat agitation in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.