वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:29 AM2021-02-15T04:29:49+5:302021-02-15T04:29:49+5:30
नियमांची एशीतैसी अंबाजोगाई : शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी ...
नियमांची एशीतैसी
अंबाजोगाई : शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षाचालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय, यामुळे रस्ता अरुंद होत आहे.
रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे.
मोबाइलधारक हैराण
बीड : बीड शहर व परिसरातील ग्रामीण भागात बी.एस.एन.एल.ची मोबाइल सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल तर ती व्यक्ती ‘आउट ऑफ कव्हरेज एरिया’ असे सांगितले जाते.
सिग्नल बंद अवस्थेत
बीड : शहरातील मुख्य चौकात उभारण्यात आलेली सिग्नल व्यवस्था अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. ही सिग्नल व्यवस्था बंद असल्यामुळे सुरू करण्याची मागणी होती, परंतु दुरुस्ती झालेली नाही.