प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:43+5:302021-02-10T04:34:43+5:30
हातगाडे रस्त्यावर गेवराई : शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात हातगाडे रस्त्याच्या ...
हातगाडे रस्त्यावर
गेवराई : शहरातील मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
पारदर्शक पाइप बसवा
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांचे फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत मीटरप्रमाणे पडते का, हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाइप पारदर्शक असावा, अशी मागणी ग्राहकांमधून केली जात आहे.
सर्वसामान्यांची लूट
अंबाजोगाई : तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. बँकेतील कामे दलालांमार्फत केल्यास तत्काळ होत असल्याने सर्वसामान्यांना फटका बसत आहे. सामान्य ग्राहक बँकेतील अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.
पाणंद रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील जेबापिंप्री येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाकडून दखल घेण्यात आलेली नाही. शेतीमाल घरी आणण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत करावी लागत आहे. रस्ता करण्याची मागणी होत आहे.
कापसाची वेचणी सुरूच
बीड : कापूस पिकाच्या दोन वेचण्यांमध्ये उत्पादन निघाले. दरम्यान, फरदड कापसाची वेचणी करण्यावरदेखील शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दरम्यान, बोंडअळीसारखा प्रकार वाढू नये म्हणून फरदड घेण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हा कृषी विभागाने केले आहे.