पार्किंगचा बोजवारा, वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:50 AM2021-02-23T04:50:20+5:302021-02-23T04:50:20+5:30
व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ...
व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे, परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गेवराई परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले
गेवराई : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याने, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे, परंतु अद्याप याकडे दुर्लक्ष होत आहे.
बसस्थानकात प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास
बीड : येथील बसस्थानकाचे सध्या नव्याने काम सुरू असून, आगार व स्थानकाचे काम केले जात आहे. परंतु, सद्यस्थितीत सर्वत्र खड्डेच खड्डे झाले आहेत. त्यातून मार्ग काढताना चालकांना कसरत करावी लागत आहे.
रस्ता दुरूस्ती रखडली
बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण ते टाकरवण फाटा रस्ता काम निकृष्ट झाल्याने वर्षातच रस्ता खराब झाला आहे. याबाबत तक्रार केली होती. रस्ता दुरूस्ती आश्वासनानंतरही रखडलेली आहे.
भाजी विक्रेत्यांची गैरसोय
नेकनूर : येथील आठवडी बाजार दर रविवारी भरतो. लाॅकडाऊन कालावधीत हा बाजार बंद होता. निर्बंध उठल्यानंतर पुन्हा एकदा बाजार भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बाजार सुरू झाला असून, असुविधेमुळे भाजी विक्रेत्यांची गैरसोय होत आहे.
नियमांची एैशीतैसी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात दुचाकी वाहनचालक व ऑटोरिक्षा चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. शहरी व ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. पार्किंगही रस्त्यावर होतेय.
रस्ता दुरूस्त करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत अद्यापही लक्ष दिले जात नाही.
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बससेवा सुरू न झाल्याने प्रवाशांना अॅपे, रिक्षा आदी खाजगी वाहनांतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीणमध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी आहे.