बीड पंचायत समितीत सत्ताबदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:03 AM2019-12-31T00:03:39+5:302019-12-31T00:04:29+5:30

पंचायत समितीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताबदल झाला आहे. असून, आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सभपतीपदी सारीका बळीराम गवते व उपसभापती शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. यावेळी ११ विरुद्ध ५ असे मतदान झाले.

Transfer of power to Beed Panchayat Committee | बीड पंचायत समितीत सत्ताबदल

बीड पंचायत समितीत सत्ताबदल

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सारिका गवते सभापती, तर शिवसेनेचे मकरंद उबाळे उपसभापती

बीड : पंचायत समितीमध्ये दुसऱ्या टर्ममध्ये सत्ताबदल झाला आहे. असून, आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली सभपतीपदी सारीका बळीराम गवते व उपसभापती शिवसेनेचे मकरंद उबाळे यांची वर्णी लागली आहे. यावेळी ११ विरुद्ध ५ असे मतदान झाले.
सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या सारीका बळीराम गवते व उपसभापती पदासाठी मकरंद उबाळे हे रिंगणात होते. तर, शिवसेनेकडून सभापती पदासाठी मनिषा खांडे तर उपसभापती पदासाठी बबन माने हे उमेदवार समोर उभे होते. यावेळी १६ सदस्यांपैकी काकू-नाना विकास आघाडी (राष्ट्रवादी) ५, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २, भाजप १, शिवसंग्राम १ असे ११ मते आघडीच्या उमेदवार सारीका बळीराम गवते व मकरंद उबाळे यांना मिळाले. त्यामुळे त्यांचा विजय झाला.
या विजयामुळे अडीच वर्षापुर्वी सदस्य सर्वांधिक असताना देखील हातची गेलेली पंचायतसमितीची सत्ता पुन्हा क्षीरसागर यांनी आपल्याकडे खेचत आ. विनायक मेटे व मा.मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना राजकीय धक्का दिला आहे.
दरम्यान सभापती व उपसभापती पदाच्या निवडीच्या काही दिवसांपुर्वी फुटलेल्या सदस्यांना व्हीप काढण्याची तयारी शिवसेना व शिवसंग्रामने केली होती. तसे त्यांनी व्हीप देखील काढला परंतु, गटनेते मकरंद उबाळे असल्यामुळे त्यांच व्हीप ग्राह्य धरत मतदानप्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे मागील काही दिवसा व्हीप नाट्या पंचायतसमिती सभापती उपसभपती निवडीत रंगले होते. निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर आ. संदीप क्षीरसारगर यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले. यावेळी मा.आ. सुनिल धांडे, बबन गवते, बळीराम गवते यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोयीच्या राजकारणातून पंचायत समित्यांवर ताबा
जिल्ह्यातील दहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत परळी, अंबाजोगाई, धारुर, माजलगाव, वडवणी आणि बीड येथे राष्टÑवादी कॉँग्रेसने बाजी मारली. केज, गेवराई, आष्टी पंचायत समित्यांमध्ये भाजपचा सभापती झाला. राज्यात सत्तांतर झाले असलेतरी स्थानिक पातळीवर सर्वच पक्षाच्या सदस्यांनी एक दुसºयाला मदत केल्याचे पहायला मिळाले. गेवराईत शिवसेनेने भाजपला मदत केली तर धारुरमध्ये भाजपने राष्टÑवादीला मदत केली. माजलगाव, परळी, वडवणीमध्ये राष्टÑवादीने आपले गट अभेद्य ठेवले. केजमध्ये मात्र हक्क असताना डावलल्याने भाजपच्या सदस्याने विरोधात मतदान करत राग व्यक्त केला. पाटोदा येथे मंगळवारी निवडणूक होणार आहे.

Web Title: Transfer of power to Beed Panchayat Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.