परळीतील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील ट्रान्सफॉर्मरला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:01 AM2020-03-25T00:01:16+5:302020-03-25T00:02:29+5:30
विद्युत निर्मितीवर परिणाम होणार नसल्याची माहिती
- संजय खाकरे
परळी : महानिर्मितीच्या येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील महापारेषण कंपनीच्या 220 के.व्ही सब स्टेशन मधील 100 एम व्ही ए च्या ट्रांसफार्मर ला रात्री 9 सुमारास अचानक आग लागली .हा ट्रान्सफार्मर जळून भस्मसात होत आहे .ही आग विझवण्यासाठी परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशामक दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आहेत तसेच नगरपरिषदेची अग्निशामक दलाची गाडीही पाचारण करण्यात आली आहे.तीन अग्निशमन गाड्या चे कर्मचारी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत,
महापारेषन कंपनी चे कार्यकारी अभियंता , इतर अभियंते व परळी औष्णिक विद्यूूत केंद्राचे उपमुख्यअभियंता व इतर अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली आहे व घटनेची पाहणी केली आहे,रात्री या आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. ट्रान्समिशन कंपनी चे सबस्टेशन हे येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्रात असून सबस्टेशन च्या तीन पैकी एका जुन्या 30 वर्षांपूर्वी च्या चालू ट्रांसफार्मरला आग लागली , यात ऑइल असल्याने आग लवकर आटोक्यात आली नाही, ही आग कशामुळे लागली हे मात्र रात्री समजू शकले नाही, या आगीचा वीज निर्मिती व वीज पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचे समजते ,अशी प्राथमिक माहिती रात्री 10.30 वाजता हाती आली आहे