हंगामी वसतिगृहाच्या चालकांची संक्रांत टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:03 AM2019-01-13T00:03:54+5:302019-01-13T00:04:05+5:30

समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊसतोड कामगार पाल्यांसाठीच्या हंगामी निवासी वसतिगृहांची तपासणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाºया राज्यस्तरीय चार पथकांचा दौरा काही कारणांमुळे रद्द झाल्याने बोगसगिरी करणा-या संबंधित हंगामी वसतिगृह चालकांसह शिक्षण विभागावर येणारी संक्रांत तूर्त टळली आहे.

The transit of the drivers of the seasonal hostel was avoided | हंगामी वसतिगृहाच्या चालकांची संक्रांत टळली

हंगामी वसतिगृहाच्या चालकांची संक्रांत टळली

Next
ठळक मुद्देराज्य पथकाचा दौरा तूर्त रद्द : शनिवारच्या तपासणीत अनेक ठिकाणी आढळली अनियमितता; बोगसगिरीचे प्रकार सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या ऊसतोड कामगार पाल्यांसाठीच्या हंगामी निवासी वसतिगृहांची तपासणी करण्यासाठी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणाºया राज्यस्तरीय चार पथकांचा दौरा काही कारणांमुळे रद्द झाल्याने बोगसगिरी करणा-या संबंधित हंगामी वसतिगृह चालकांसह शिक्षण विभागावर येणारी संक्रांत तूर्त टळली आहे. तर शासनाच्या या पथकाचा दौरा अचानक रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
बालकांच्या नियमित शिक्षणासाठी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत बीड जिल्ह्यात हंगामी वसतिगृह योजनेची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी तसेच २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ या चार वर्षांमध्ये शासनाने दिलेल्या निधीचा योजनेसाठी कसा विनियोग केला तसेच त्या वसतिगृहांबाबतचे लेखा आणि इतर बाबींची तपासणी ही समिती करणार होती.
मुंबई, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, यवतमाळ येथील अधिकाºयांचे पथक बीड जिल्ह्यात १४ ते १६ जानेवारीदरम्यान येणार होते. परंतू या समितीचा हा दौरा अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाला आहे.
अचानक दौरा रद्द झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे दौरा रद्द झाला की काय? अशी शंका व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे मागील चार वर्षात झालेली बोगसगिरी तसेच अनियमितता करणाºयांवरील संक्रात तूर्त टळली आहे. या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता या पथकांचा फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दौरा होऊ शकतो असे सांगण्यात आले.
सर्जिकल स्ट्राइक : अनेक ठिकाणी तफावत
दरम्यान १४ जानेवारीला राज्य पथक येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच अग्रीम खर्चाच्या अनुषंगाने शनिवारी जिल्ह्यातील शिरुर वगळता इतर तालुक्यातील हंगामी वसतिगृहांची अचानक तपासणी करण्यात आली. मागील वर्षी वन डे तपासणी केल्यानंतर बोगसगिरीचे बिंग फुटले होते. यावर्षी तसे काही होत आहे का याची तपासणी करण्याबाबत केंद्रप्रमुख, केंद्रीय मुख्याध्यापक, विस्तार अधिकाºयांना आदेश दिले होते. मागील तपासणीमुळे सुधारणा होईल असे वाटले होते. मात्र शनिवारी जिल्ह्यातील काही वगळता बहुतांश हंगामी वसतिगृहांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावती आढळून आल्या.

Web Title: The transit of the drivers of the seasonal hostel was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.