परळीत वाहतुकीचे नियोजन कोलमडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:34 AM2021-09-19T04:34:46+5:302021-09-19T04:34:46+5:30
परळी : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते उपजिल्हा रुग्णालयादरम्यान रस्त्यावरच बेशिस्तीत वाहने लागत आहेत. पी-वन, पी-टू ची अंमलबजावणी ...
परळी : शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर ते उपजिल्हा रुग्णालयादरम्यान रस्त्यावरच बेशिस्तीत वाहने लागत आहेत. पी-वन, पी-टू ची अंमलबजावणी न झाल्याने वाहतूककोंडी होत आहे. त्यातच जड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने शनिवारी दुपारी एकच्या दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली होती. याचा फटका नागरिकांना बसला. यात नियोजनाचा अभाव दिसून आला.
शहरातील राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौकातच एसबीआय बँक, छत्रपती राजर्षी शाहू बँक, नगरपालिकेचे भालचंद्र वाचनालय, पोस्ट कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय व बँकेचे तीन एटीएम असल्याने या ठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. या रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे.
...
पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासनातर्फे वाहतुकीचे कुठल्याही प्रकारचे नियोजन करण्यात न आल्याने नागरिकांना त्रास होत आहे. उपजिल्हा रुग्णालय भागातून जड वाहनांना बंदी घालण्यात यावी. शहरातील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची या वाहतूककोंडीमुळे गैरसोय होत आहे. प्रशासनाने तातडीने यासंदर्भात उपाययोजना कराव्यात.
-अश्विन मोगरकर, सामाजिक कार्यकर्ते, परळी.
...
एसबीआय बँकेसमोर रस्त्यावरच बँक खातेदारांच्या दुचाकी लावण्यात येत आहेत. त्यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासंदर्भात बँकेने नियोजन करावे.
-गोपाळ आंधळे, शिक्षण समिती सभापती, नगरपालिका, परळी.
180921\img20210918125439_14.jpg~180921\img20210918125259_14.jpg