दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 11:55 PM2019-11-05T23:55:07+5:302019-11-05T23:55:44+5:30

पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले.

Travel from Drought to Heavy Rain Ambajogai taluka | दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास

दुष्काळ ते अतिवृष्टी अंबाजोगाई तालुक्याचा प्रवास

Next
ठळक मुद्देपरतीच्या पावसाने रबी हंगाम लांबला : निसर्गानं दिलं ते पावसानं हिरावलं; परतीच्या पावसाने केले पिकांचे नुकसान

अविनाश मुडेगावकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : पावसाळ्यातील तीन महिने अत्यल्प पाऊस झाल्याने शासनाने अंबाजोगाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला. इकडे तालुक्यात दुष्काळ जाहीर होताच परतीच्या पावसाने अक्षरश: अंबाजोगाई तालुक्याला धोधो पावसाने झोडपून काढले. जी काही पिके आली होती. ती झालेल्या मुसळधार पावसाने पाण्यात तरंगली.
सोयाबीन, कापूस, पिवळा, बाजरी, या पिकांची या पावसाने अतोनात नुकसान झाले. परिणामी रबी हंगामही परतीच्या पावसाने लांबला आहे. तालुक्यात तळ्यांमध्ये नव्हे तर पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. कोरडा दुष्काळ ते अतिवृष्टी असा प्रवास अंबाजोगाई तालुक्याचा झाला आहे.
तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर जून महिन्याच्या अखेरीस अत्यल्प पाऊस झाला. या पावसावर अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या. मात्र, पुन्हा जो पाऊस उघडला तो सप्टेंबर महिना संपेपर्यंत आलाच नाही. आॅक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात परतीचाही पाऊस तसा तुरळकच राहिला. यामुळे रबीच्या पेरण्या चांगल्या होतील. अशी अपेक्षा शेतकरी बाळगून होता. मात्र, सलग दोन दिवस परतीच्या पावसाने हाहा:कार केला व सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. एकाच दिवसात नव्वद मिलिमीटरपर्यंत पावसाचे नोंद झाली. तालुक्यात ८४ हजार हेक्टर खरीपाचे क्षेत्र आहे. जुलैमध्ये कशाबशा ७० हजार हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्या. मात्र, परतीच्या पावसाने या सर्व पिकांवर पाणी फेरले. पेरणीचा खर्च, काढणीचा खर्च, कसा काढायचा हा प्रश्न शेतकऱ्यांना तीव्रतेने भेडसावू लागला आहे. सततच्या पावसाने शेतात वाढलेले तण काढण्यासाठीही मोठा खर्च येतो. त्यात पीकविम्याची रक्कमही अद्यापही अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाली नाही. सलग दोन वर्षे झालेले दुष्काळाचे सावट आता झालेल्या पावसानेही रबी हंगाम लांबणीवर पडला आहे. शेतात पिकांपेक्षा तण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या सर्व समस्यांनी शेतकरी ग्रासलेला आहे. शेतकºयांच्या खिशात खडखडाट असताना नवनवीन संकटे समोर येत आहेत. वाढता खर्च भागवायचा कसा? हे नवीन संकट उभे राहिले आहे. शेताची पाहणी, नुकसानीचे पंचनामे सुरू असले शेतकºयांना मदत मिळणार की केवळ मदतीचा फार्स होणार?

Web Title: Travel from Drought to Heavy Rain Ambajogai taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.