जखमी वासरावर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:34 AM2021-05-19T04:34:23+5:302021-05-19T04:34:23+5:30
.... नगरपंचायतीकडून दिव्यांगांना मदतीचा हात शिरूर कासार : कोरोना संकटकाळात शहरातील दिव्यांग बांधवांना सोमवारी नगरपंचायतीने मदतीचा हात पुढे करीत ...
....
नगरपंचायतीकडून दिव्यांगांना मदतीचा हात
शिरूर कासार : कोरोना संकटकाळात शहरातील दिव्यांग बांधवांना सोमवारी नगरपंचायतीने मदतीचा हात पुढे करीत किराणा सामान दिले. यात गव्हाचा आटा, दाळ, तेल, साखर अशा सोळा वस्तूंचा समावेश होता. मुख्याधिकारी किशोर सानप यांच्या संकल्पनेतून किराणा सामान देण्यात आले.
शहरातील जवळपास ४५ दिव्यांगांना सुमारे ५१ हजारांचा किराणा सामान दिले. यावेळी दिव्यांग संघटनेचे कमलाकर वेदपाठक, विष्णू सव्वासे, जीवन महानुभव, विजय घोगरकर यांनी थकीत देय रकमेची मागणी केली. दिव्यांगांना कर माफी देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नगरपंचायतीचे वरिष्ठ लेखापाल चंद्रकांत दामोधर, आनंद जावळे, बाळासाहेब तगर, संजय गायकवाड, मन्सुर शेख, सुनील शेटे, कौसर शेख, गणेश कातखडे यांनी परिश्रम घेतले.