इंगळे व उगले महाराजांना तालुक्यात श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:35 AM2021-05-21T04:35:17+5:302021-05-21T04:35:17+5:30
गोशाळेतील गाईंसाठी चारा शिरूर कासार : सिध्देश्वर संस्थानवरील गोशाळेतील गाईंसाठी चारा देण्याचे आवाहन महंत स्वामी विवेकानंद ...
गोशाळेतील गाईंसाठी चारा
शिरूर कासार : सिध्देश्वर संस्थानवरील गोशाळेतील गाईंसाठी चारा देण्याचे आवाहन महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत गुरुवारी रवींद्र बन्सी गाडेकर यांनी आपल्या शेतातील सरमाडाचा चारा पोहोच केला. सर्वांनीच गाईंसाठी योगदान देण्याचे आवाहन विवेकानंद शास्त्री यांनी केले आहे.
शेतात मोघडा पाळी, कामाची धांदल
शिरूर कासार :
खरिपाचा हंगाम आता तोंडावर आला असून पाऊस पडला की कापूस, तूर लावणी व पेरणी कामाला सुरुवात करता यावी, यासाठी सध्या शेतक-याची नांगरलेल्या शेतात मोघडा पाळी कामाची धांदल सुरू असल्याचे चित्र शेत शिवारात दिसून येते.
खते बियाणे खरेदीसाठी शेतकरी दुकानावर
शिरूर कासार : ऐनवेळी वाणतूट होऊन पाहिजे ते बियाणे व खत मिळण्यासाठीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी दुकान उघडताच शेतकरी दुकानावर धाव घेत आहेत. आपल्या पसंतीप्रमाणे खते, बियाणे खरेदी केले जात असल्याचे दिसत आहे .
आंब्याचे नुकसान; शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
शिरूर कासार :
गतवर्षी पाऊस समाधानकारक झाल्याने आंब्याला मोहर व फळधारणा चांगली झाली होती; मात्र ऐन आंबा पाडाला येण्यावेळीच दोन- तीन दिवस आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडाखाली कच्च्या कैऱ्यांचा सडा पडून मोठे नुकसान झाले व शेतक-यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. एका झाडाने किमान दहा हजार दिले असते, असे नामदेव थोरात यांनी सांगितले. मात्र वाऱ्याने मोठ्याप्रमाणात नुकसान केले.