इंगळे महाराज यांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:32 AM2021-05-15T04:32:42+5:302021-05-15T04:32:42+5:30
शिरूर कासार : बाबासाहेब इंगळे महाराज यांना अखिल भारतीय मंडळ तसेच शिरूर येथील भजनी मंडळाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण ...
शिरूर कासार : बाबासाहेब इंगळे महाराज यांना अखिल भारतीय मंडळ तसेच शिरूर येथील भजनी मंडळाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. विनोदातून अध्यात्म अंगी रुजवणारे इंगळे महाराज यांच्या निधनाने वैष्णव सांप्रदायाची मोठी हानी झाल्याची भावना व्यक्त केली. बाबासाहेब इंगळे महाराज यांना विनोदाचार्य ही पदवी वै.संत भीमसिंह महाराज यांनी बहाल केली होती. सिद्धेश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, श्रीरंग महाराज, भानुदास महाराज शास्त्री, बडे महाराज आदी महाराज मंडळीसह चंद्रकांत थोरात, भाऊसाहेब नेटके, गोविंद पाटील, रमेश बडे, अंबादास बडे आदींनी दु:ख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
भोजनावळ टाळत गाईला दिला घास
शिरूर कासार : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दिवंगत पितरांना भोजन देण्याची प्रथा आजही जतन केली जाते. यानिमित्ताने पाहुण्यांना निमंत्रण देऊन सन्मानपूर्वक आमरसाचे जेवण दिले जाते. मात्र कोरोनामुळे भावनेला आवर घालत काहींनी दिवंगत पितरांच्या नावे गाईला घास घातला.
लोणच्यासाठी कैऱ्यांची बुकिंग
शिरूर कासार : उन्हाळा समारोपाकडे जात असतांनाच बाजारात आंब्याच्या पाट्या शहरात दाखल व्हायच्या, गांधीचौकात विक्रेता आणि आंबे खरेदी करण्यासाठी झुंबड असायची, मात्र याही वर्षी हा सिझन कोरोनामुळे असाच गेला. बाजारात लोणच्यासाठी कैरी व गावरान आंबे कुठेच दिसत नाही. याही वर्षी कैरीची वानवा जाणवत आहे. बाजार बंद असल्याने गांधी चौकात येणारे आंबे, कैरी येणे बंद झाली कैरीसाठीदेखील आता आगाऊ नोंदणी करावी लागत असल्याचे सांगितले गेले आहे.