त्रिमूर्ती’ वृक्षांचा वर्धापन दिन; एकत्रित जलाभिषेक, फूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:22 AM2021-01-01T04:22:46+5:302021-01-01T04:22:46+5:30
निसर्ग संरक्षण संवर्धनाचे कार्य गेल्या वीस वर्षापासून अखंडपणे करत असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या परिसरात गेल्या वर्षी मुंबई येथील ...
निसर्ग संरक्षण संवर्धनाचे कार्य गेल्या वीस वर्षापासून अखंडपणे करत असलेल्या सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राच्या परिसरात गेल्या वर्षी मुंबई येथील क्षितीज हिरलेकर यांनी सर्पराज्ञी परिसरात लावण्यासाठी आणलेल्या एकाच कुंडीत वड, पिंपळ व उंबर या तीनही त्रिमूर्ती स्वयंसिद्ध वृक्षांचे रोप दिसून आली. त्यानंतर ही रोपे सर्पराज्ञीच्या वन्यजीवांच्या निवारा शेडच्या समोर सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे व सृष्टी सोनवणे यांनी ती लावली होती.
या वृक्षांना आज दि २९ डिसेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याने त्यांनी त्यांचा प्रथम वर्धापनदिन या वृक्षांना जलाभिषेक व दीप प्रज्वलन फुले वाहून सायंकाळी सहा वाजता आजरा केला. सर्पराज्ञीचे संचालक सिद्धार्थ सोनवणे सृष्टी सोनवणे, आर,एम शिंदे (माजी सहआयुक्त समाजकल्याण बीड तथा संशोधन अधिकारी जी.जा.प्र.प.समिती लातूर), अस्मिता जावळे (मुख्याध्यापिका, शासकीय निवासी शाळा शिरूर कासार), डॉ शशिकुमार सवाई, सर्पमित्र बालाजी गुरुखुदे यांच्या उपस्थितीत निसर्ग संरक्षण संवर्धनाचा संदेश देत मोठ्या उत्साहात वृक्षलागवडीचा पहिला वर्धापन दिन साजरा केला.
त्रिमूर्ती वृक्ष- वड -पिंपळ औदुंबर यांची विशेष ओळख
वड ब्रह्मदेवाचे निवासस्थान तर शिवाचे साधना स्थान आणि १४०० वर्ष आयुष्य लाभलेले योगीराज चांगदेव महाराज यांची ओळख चांगा वटेश्वर म्हणून मान्यता आहे, दीर्घायुषी झाड आहे. पिंपळाच्या झाडाखाली बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने त्यास बोधीवृक्ष म्हणतात. शिवाचा अत्यंत प्रिय वृक्ष तसेच अश्वथ्थ ही माझी विभुती असल्याचे गितेत भगवान कृष्णानी सांगितले आहे .
भारतरत्न पुरस्काराचे स्मृतिचिन्हाचे प्रतीक पिंपळ पान.
औदुंबर (उंबर )साक्षात दत्ताचे निवासस्थान म्हणून मानले जाते तर आयुर्वेदात औषधी वनस्पती म्हणून गुणकारी आहे .