तिहेरी हत्याकांड; आरोपींना ५ दिवस पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:20 AM2019-08-04T00:20:38+5:302019-08-04T00:21:14+5:30

२७ जुलै रोजी शेतीच्या वादातून तीन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला होता. यातील आरोपी किसन व त्याची दोन मुले डॉ. सचिन व अ‍ॅड. कल्पेश पवने यांना पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने शनिवारी सुनावली आहे.

Triple massacre; Police detained the accused for 7 days | तिहेरी हत्याकांड; आरोपींना ५ दिवस पोलीस कोठडी

तिहेरी हत्याकांड; आरोपींना ५ दिवस पोलीस कोठडी

Next

बीड : २७ जुलै रोजी शेतीच्या वादातून तीन सख्ख्या भावांचा खून करण्यात आला होता. यातील आरोपी किसन व त्याची दोन मुले डॉ. सचिन व अ‍ॅड. कल्पेश पवने यांना पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने शनिवारी सुनावली आहे.
शहराजवळील वासनवाडी शिवारात शेतीच्या वादातून दिलीप, किरण व प्रकाश पवने यांची त्यांच्याच सख्खा भाऊ व पुतण्यांनी मिळून निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी किसन व त्याच्या दोन मुलांना अटक करुन कोर्टात हजर केले. त्यावेळी ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर केल्यानंतर बीडचे दुसरे प्रथम वर्ग न्या. चिंतामण शेळके यांनी ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे. दरम्यान, पोलिसांनी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने पाच दिवसांची कोठडी मंजूर केली.

Web Title: Triple massacre; Police detained the accused for 7 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.