रुग्णालयाभोवती घाण साचल्याने त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:33 AM2021-04-17T04:33:59+5:302021-04-17T04:33:59+5:30

गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसराभोवती घाण साचली आहे. यामुळे दुर्गंधी सुटली असून, रुग्ण व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात येऊ ...

Trouble with dirt around the hospital | रुग्णालयाभोवती घाण साचल्याने त्रास

रुग्णालयाभोवती घाण साचल्याने त्रास

Next

गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालय परिसराभोवती घाण साचली आहे. यामुळे दुर्गंधी सुटली असून, रुग्ण व नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. परिसरात कचरा टाकू नये, असे वारंवार सांगण्यात येऊनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांकडून होत आहे.

लोंबकळणाऱ्या तारा ताणून घेण्याची मागणी

पाटोदा : तालुका आणि परिसरातील गावांमध्ये अनेक ठिकाणी वीजतारा लोंबकळत आहेत. त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. वीजतारा ताणण्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे. महाविरतण कर्मचारी वेळेवर सापडत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.

अनेक भागांतील पथदिवे अद्यापही बंदच

बीड : शहरातील अनेक भागांमध्ये पथदिवे बंदच राहत आहेत. कोरोना काळामध्ये रुग्णालयात ये-जा करताना तसेच औषधी आणताना नागरिकांना अडचणी येत आहेत. काहीवेळा गरज नसतानाही पथदिवे सुरू असल्याचे निदर्शनास येते. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन, रात्री पथदिवे सुरू ठेवावेत, अशी मागणी होत आहे.

खंडित वीजपुरवठ्याने पालीकर वैतागले

बीड : तालुक्यातील पाली आणि परिसरात वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना पाणी असूनही पिकांना देता येत नसल्याने पिके वाळत आहेत. अनेक ठिकाणी तारा खाली आल्या असून, जीर्ण तारांमुळे वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Trouble with dirt around the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.