वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकमालकास २ लाख ९२ हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:32 AM2021-03-20T04:32:46+5:302021-03-20T04:32:46+5:30
केज : तालुक्यातून उस्मानाबाद जिल्ह्याकडे जाणाऱ्या वाळूच्या दोन ट्रक वाहतूक शाखेने ताब्यात घेतल्या होत्या. त्यातील वाळूचे मोजमाप करून ...
केज : तालुक्यातून उस्मानाबाद जिल्ह्याकडे जाणाऱ्या वाळूच्या दोन ट्रक वाहतूक शाखेने ताब्यात घेतल्या होत्या. त्यातील वाळूचे मोजमाप करून पाहिले असता त्यापैकी एका ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळू आढळल्याने २ लाख ९२ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला.
केज येथील धारूर रोड, जय भवानी चौकातून १७ मार्च रोजी दुपारी वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रक क्र. (एमएच-४५/टी-६८६३) व
(एमएच -१२/एफझेड-७५३६) या वाळूची वाहतूक करीत होत्या. यात प्रमाणापेक्षा जास्त वाळू वाहतूक होत असल्याचा संशय आल्यामुळे वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी हनुमंत चादर यांनी सापळा लावून सदरील दोन्ही गाड्या अडवून त्या पोलिस ठाण्यात आणल्या. तहसीलदारांच्या आदेशाने मंडळा अधिकारी भागवत पवार यांनी वाळू साठ्याचे पंचासमक्ष मोजमाप केले असता वाहन क्र.(एमएच-४५/टी-६८६३) मध्ये त्यांच्याकडे २ ब्रास वाळू वाहतुकीचा परवाना असताना २.२२ ब्रास वाळू आढळून आली. तर (एमएच -१२/एफझेड-७५३६) मध्ये ३ ब्रास क्षमतेचा परवाना असताना त्यात क्षमतेपेक्षा कमी म्हणजे २.७५ ब्रास वाळू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्याला दंड झाला नाही.
पोलीस आणि महसूल विभागाच्या कार्यवाहीमुळे अवैध आणि चोरट्या वाळू वाहतुक करणारे धास्तावले आहेत.
===Photopath===
190321\deepak naikwade_img-20210319-wa0009_14.jpg