अडचणींवर मात करून पुढे जाणारेच खरे योद्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:11+5:302021-08-01T04:31:11+5:30
बीड : शिक्षण घेत असताना अनेक अडीअडचणी येत असतात. त्यामुळे खचून न जाता हिमतीने त्यावर मात करून ...
बीड : शिक्षण घेत असताना अनेक अडीअडचणी येत असतात. त्यामुळे खचून न जाता हिमतीने त्यावर मात करून पुढे जावे लागते आणि तोच खरा योद्धा असतो, देशाचे मिसाईलमॅन आणि भारताचे राष्ट्रपती ए.पी.जे. कलाम हे आपल्यासाठी प्रेरणा व उदाहरण आहेत, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक ए. राजा यांनी केले.
शहरातील नॅशनल महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी सिद्दिकी नविद अब्दुल अजिज यांची नियुक्ती झाल्याबद्दल शनिवारी बीड येथील शासकीय विश्रामगृहात सत्कार तसेच यूपीएससी, एमपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन खुर्शीद आलम मित्रमंडळाने केले होते. या कार्यक्रमात पाेलीस अधीक्षक बोलत हाेते.
या वेळी मुफ्ती शेख जावेद, मौलाना जाकेर, मुफ्ती अब्दुल्ला कुरेशी, मुफ्ती अनवर, माजी आ. सय्यद सलीम, सिराजोदीन देशमुख, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेश कासट, जे.डी. शाह, नियोजन समिती सदस्य तथा माजी सभापती खुर्शीद आलम, डाॅ. अनवरी, ज्येष्ठ समाजसेवक हजी मैनोदीन, हाजी अजिज, डाॅ. मतीन, वाजेद, नगरसेवक मोमीन मोहसिन, शेख आमेर, फारोक मणियार, माजी सभापती शकिल खान आदी उपस्थित होते.
या वेळी ए. राजा म्हणाले, सिद्दिकी नविद हे आपले नोकरीपुरतेच काम न करता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. समाजासाठी त्यांचे काम कौतुकासपद आहे. कार्यक्रमासाठी खुर्शीद आलम मित्रमंडळाचे सैयद अल्ताफ, शहेबाज सौदागर, मोहम्मद शाहनवाज, शेख साहील, मोमीन आवेज, मोहम्मद सादेख, कुरैशी माजिद, शेख कलीम, शेख बाबू, मं. शहेजाद, शेख मोहसिन, मोमीन सद्दाम, शहेराज शेरा, अनीस पठाणसह राबिया बसरी सेवाभावी संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन इसहाक यांनी केले.
310721\31_2_bed_9_31072021_14.jpeg
पोलीस अधीक्षक मार्गदर्शन