शासनाविरुद्ध रणशिंग फुंकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:25 AM2018-10-01T00:25:26+5:302018-10-01T00:26:06+5:30
आगामी लोकसभा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ उद्या सोमवारी बीड येथून होत आहे. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध रणशिंग फुंकतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आगामी लोकसभा, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील होणाऱ्या विजयी संकल्प सभांचा शुभारंभ उद्या सोमवारी बीड येथून होत आहे. या सभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार हे राज्य आणि केंद्र शासनाविरुद्ध रणशिंग फुंकतील.
बीडच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून, हजारोंच्या संख्येने मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, माजी आ.अमरिसंह पंडित, जिल्हा अध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, युवक नेते संदीप क्षीरसागर माजी आ.उषाताई दराडे, माजी आ. सय्यद सलीम, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी आ.राजेंद्र जगताप, युवक नेते अक्षय मुंदडा, बाळासाहेब आजबे काका, महेंद्र गर्जे आदींनी केले आहे.
येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर असलेल्या बागलानी ईस्टेट येथे ही विजयी संकल्प सभा उद्या १ आॅक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील.
या सभेसाठी पवार यांचे रविवारी सायंकाळी बीड शहरात आगमन झाले. १५ दिवसांपासून सभेची जय्यत तयारी करण्यात येत आहे. प्रमुख नेत्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मेळावे घेऊन वातावरण निर्मिती केली आहे. तब्बल ३ वर्षानंतर पवार हे बीड जिल्ह्यात येत असल्याने ते काय बोलतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्यास अधिक महत्त्व आहे.