ऑडिओ क्लिपद्वारे माझ्या बदनामीचा प्रयत्न- पंकजा मुंडे
By Admin | Published: October 10, 2016 07:33 PM2016-10-10T19:33:06+5:302016-10-10T19:54:01+5:30
भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या प्रकरणावर अखेर राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंनी मौन सोडलं आहे.
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 10 - भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या प्रकरणावर अखेर राज्याच्या महिला आणि बालविकासमंत्री पंकजा मुंडेंनी मौन सोडलं आहे. ऑडिओ क्लिपद्वारे माझ्या बदनामीचा प्रयत्न केला जातोय, ऑडिओ क्लिप मोडून तोडून बनवल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, भगवानगडापासून मला दूर करणा-या प्रयत्न केला जातोय. भगवानगडाचा मी कधीही अपमान केला नाही. अखेरच्या श्वासापर्यंत भगवानगडाबाबत अपशब्द काढणार नाही. नामदेवशास्त्री का दुरावले समजत नाही. दस-यादिवशी भगवानगडावर जाणारच, असा ठाम निर्धार पंकजा मुंडेंनी बोलून दाखवला आहे.
मी नेहमीच संघर्षासाठी तयार असून, लोकांसाठी संघर्ष करत राहणार आहे. लोकांसमोर सत्य नेणार आहे. भगवानगडानं माझ्या वडिलांचा नेहमीच सन्मान केला. मात्र आता मला का विरोध केला जातोय, याचं कारण माहिती नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.