आरोग्यवर्धनीमध्ये क्षयरोग जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:31+5:302021-03-25T04:31:31+5:30

क्षय रोग हा एक जिवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा रोग ...

Tuberculosis awareness in health promotion | आरोग्यवर्धनीमध्ये क्षयरोग जनजागृती

आरोग्यवर्धनीमध्ये क्षयरोग जनजागृती

googlenewsNext

क्षय रोग हा एक जिवाणूजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एकेकाळी हा रोग दुर्धर समजला जात होता. १८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला. त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास २४ मार्च रोजी मान्यता मिळाली. म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो, असे मत वैद्यकीय अधिकारी डाॅ अरुण मोराळे यांनी सांगितले.

वडवणी आरोग्यवर्धनी केंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक हर्षा बनसोडे, आरोग्य सेवक भास्कर वाघे, मनोज वाघमारे, आरोग्य सेविका कल्याणी दरवाई , आरोग्य सहाय्यक मधुकर साळवे, नांगरे एम.जे. उपस्थित होते.

ज्या व्यक्तीला क्षयरोग (टी.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते. एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी संशयित व्यक्तींना आरोग्यवर्धनी केंद्रात पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. हाडे सांध्याचा क्षयरोग, लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग, आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा औषधांना चिकटून रहाणे ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे, असे वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक एच.एम. बनसोडे, आरोग्य सेवक भास्कर वाघे यांनी सांगितले.

===Photopath===

240321\rameswar lange_img-20210324-wa0047_14.jpg

===Caption===

वडवणी आरोग्यवर्धनी केंद्रात जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी  हर्षा बनसोडे,  भास्कर वाघे, मनोज वाघमारे,  कल्याणी दरवाई ,  मधुकर साळवे ,नांगरे एम जे, उपस्थित होते.

Web Title: Tuberculosis awareness in health promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.