क्षयरुग्णांचे पोषण लटकले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:12+5:302021-08-19T04:37:12+5:30
बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहार भत्ता म्हणून प्रती महिन्याला ५०० रुपये भत्ता दिला जातो. परंतु, ...
बीड : क्षयरोग्यांना पौष्टिक आहार मिळावा, यासाठी पोषण आहार भत्ता म्हणून प्रती महिन्याला ५०० रुपये भत्ता दिला जातो. परंतु, रुग्णांनी बँक खाते क्रमांक व आवश्यक माहिती न दिल्याने भत्ता देण्याचे प्रमाण १०० टक्के होण्यास अद्यापही २२ टक्के बाकी आहेत. भत्ता वाटपात बीड राज्यात दुसरे आहे.
..
क्षयरोगाची लक्षणे काय
दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, बेडक्यातून रक्त पडणे, सायंकाळी येणारा ताप ही क्षयरोगाची (टीबी) मुख्य लक्षणे आहेत. खोकला, थुंकी व शिंकण्यातून हा आजार जास्त प्रमाणात पसरतो. कारण, हा आजार संसर्गजन्य असल्याचे सांगण्यात आले.
...
जास्तीत जास्त २८ महिन्यांत क्षयरोगमुक्त
n एखादा रुग्ण क्षयरोगमुक्त होण्यासाठी कमीत कमी सहा महिने कालावधी लागतो.
n औषधाला दाद न देणाऱ्या क्षयरुग्णाला क्षयरोगमुक्त होण्यासाठी ९ ते २८ महिने कालावधी लागत असल्याचे सांगण्यात आले.
...
रुग्णांनी माहिती द्यावी
जिल्हा पोषण आहार भत्ता देण्यात राज्यात दुसऱ्या स्थानी आहे. काही रुग्ण बँक खाते वेळेवर देत नसल्याने भत्ता देण्यास अडचणी येतात. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. रुग्णांनी माहिती द्यावी.
- डॉ. जयवंत मोरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी, बीड,