तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:03 AM2022-10-27T11:03:19+5:302022-10-27T11:48:54+5:30

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या

Tukaram Mundhe Diwali Tour to Village, Beed District hospital Surprise Visit by IAS tukaram munde | तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्...

तुकाराम मुंढेंचा गावाकडे दिवाळी दौरा, जिल्हा रुग्णालयास सरप्राईज व्हिजिट अन्...

googlenewsNext

बीड - शिस्तप्रिय आणि डॅशिंग सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेले आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे दिवाळीनिमित्त गावाकडे आले आहेत. गावाकडील दौऱ्यात बीड जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना भेटी देऊन आढावा घेण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांची चांगलीच झोप उडाली. मुंढे यांचा दौरा हा 25 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधी होत आहे. आपल्या दौऱ्यात त्यांनी बीड जिल्हा रुग्णालयास भेट दिल्याने तेथील आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाल्याचा पाहायला मिळालं. 

तुकाराम मुंढे यांनी आरोग्य विभागातील आयुक्त पदाचा कारभार हाती घेताच डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याबाबतच्या सुचना केल्या. तसेच रात्री अचानक तपासणी करण्यासाठी राज्यभरात एकाचवेळी सुचना केल्या होत्या. बीडमध्येही चऱ्हाटा, नाळवंडी येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. यात डॉक्टर गैरहजर आढळले होते. त्यानंतर आयुक्तांनी सर्वच अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन रूग्णसेवा सुधारण्याबाबत सुचना केल्या होत्या. आता स्वत: तुकाराम मुंढे हेच ऐन दिवाळीत बीड दौऱ्यावर आले आहेत. दौऱ्यात त्यांनी आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देण्यासह आढावा घेणार असल्याचे सांगितले होते. 

त्यानुसार, बीडच्या जिल्हा रुग्णालयाला तुकाराम मुंढेंनी सायंकाळच्या वेळी अचानक भेट दिली आणि तिथल्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलंह. तसेच सायंकाळच्या वेळेस त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्याने वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूसही केली. 

आयसीयु विभागालाही भेट

तुकाराम मुंढेंनी अति दक्षता विभागाची पाहणी केली, त्यावेळी औषधाचे रेकॉर्ड त्यांना आढळून आलं नाही, त्यामुळे, तेथील कर्मचाऱ्यांना सज्जड दम देत, काम जमत नसेल तर नोकरी सोडून द्या अशा शब्दात कानउघडणी केली. मुंढेंच्या सरप्राईज व्हिजीने अनेक डॉक्टरांना ऐनवेळी व्यवस्थित उत्तर देखील देता आली नाहीत, त्यामुळेही मुंढे चांगलेच संतापले होते.

डॉ. सुरेश साबळे जिल्हा शल्य चिकित्सक

जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.सुरेश साबळे यांची शुक्रवारी ऑर्डर निघाली. वर्षभरापासून तेच प्रभारी म्हणून काम पहात होते. ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालयांची माहिती घेतली असता दररोज सरासरी एकही प्रसुती होत नसल्याचे समोर आले होते. तसेच, जिल्हा रूग्णालयात प्रवेश करताच नाकाला रुमाल लावावा लागत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता, रूग्णसेवेतील अनियमितता आदी समस्या येथे आहेत. अनेकदा औषधीही बाहेरून आणावी लागतात, अशा लोकांच्या तक्रारी आहेत.  
 

Web Title: Tukaram Mundhe Diwali Tour to Village, Beed District hospital Surprise Visit by IAS tukaram munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.