राजकीय तव्यावरील सत्तेची भाकरी फिरवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:32 AM2020-12-31T04:32:05+5:302020-12-31T04:32:05+5:30

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. ...

Turned the bread of power on the political tawa | राजकीय तव्यावरील सत्तेची भाकरी फिरवली

राजकीय तव्यावरील सत्तेची भाकरी फिरवली

Next

बीड : राजकारणात २०२० हे सरते वर्ष अनेकांना लाभदायी ठरले असले तरी मातब्बरांना सत्तेपासून दूर ठेवत अनपेक्षित धक्का दिला. विधानसभा निवडणुकीत बीडमध्ये संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना तर परळीत बहीण-भावाच्या लढतीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत करीत राज्याचे लक्ष बीड जिल्ह्यांकडे वेधले. विशेष म्हणजे, युतीतील दोघेही कॅबिनेट मंत्री पराभूत झाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना या सरत्या वर्षाने भाजपाच्या तत्कालीन कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध मोठ्या फरकाने विजयश्रीच मिळवून दिली नाही तर कॅबिनेट त्र्यांची माळ गळ्यात घालून जिल्ह्याचे पालकमंत्री दिले. याउलट पंकजा मुंडेंना सरत्या वर्षात सातत्याने संघर्ष करावा लागला. गोपीनाथगडावरून एकनाथ खडसे यांनी भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यजमान पंकजा मुंडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासमक्ष जोरदार हल्ला केला. या प्रकाराची गंभीर दखल पक्षाने घेतली आणि त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष राजकीय फटका पंकजा मुंडेंना बसला. विधान परिषदेवर त्यांना घेतले जाईल, अशी चर्चा सुरू असतानाच रमेश कराड यांना घेतले. इकडे सत्तेत येताच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा परिषद ताब्यात घेऊन मागच्या पराभवाची परतफेड केली.

पुतण्याकडून काका पराभूत

परळीप्रमाणेच बीडमध्येही या सरत्या वर्षाने इतिहास घडविला. संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळवित बीड विधानसभा मतदारसंघात तत्कालीन कॅबिनेटमंत्री आणि आपले सख्खे काका जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करून जिल्ह्याला हादरा दिला. विशेष म्हणजे, जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेत आले होते. इकडे आष्टीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब आजबे यांना लाॅटरी लागली. त्यांनी तत्कालीन विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचा पराभव केला. इकडे माजलगावातही भाजपाचे रमेश आडसकर यांना प्रकाश सोळंके यांनी पराभूत करीत भाजपाची जागा हिसकावली. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या नमिता मुंडे यांना या सरत्या वर्षाने साथ देत विधानसभेवर निवडून दिले. या सरत्या वर्षात भाजपाची पिछेहाट झाली. विधानसभेचे संख्याबळ हे पाचवरून दोनवर आले तर राष्ट्रवादीचे संख्याबळ एकवरून चारवर गेले. जिल्हा परिषदेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आणि अध्यक्षपदी शिवकन्या सिरसाठ विराजमान झाल्या.

Web Title: Turned the bread of power on the political tawa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.