बीड जिल्ह्यातून दोन अट्टल दुचाकीचोर हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 02:54 PM2019-03-12T14:54:11+5:302019-03-12T14:57:11+5:30

अधीक्षकांनी या दोघांनाही वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले.

Two bike theft exile from Beed district | बीड जिल्ह्यातून दोन अट्टल दुचाकीचोर हद्दपार

बीड जिल्ह्यातून दोन अट्टल दुचाकीचोर हद्दपार

Next

बीड : दुचाकी चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना बीड जिल्ह्यातून वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी मंगळवारी केली.

कृष्णा कोंडीराम शिंपले व दादासाहेब सुग्रीव नाईकवाडे (रा.अंबेवडगाव ता.धारूर जि.बीड) अशी हद्दपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पोलिसांनी याचा तपास करून कृष्णा व दादासाहेबला बेड्या ठोकल्या. वारंवार कारवाई केल्यानंतरही त्यांच्यात सुधारणा होत नसल्याने त्यांच्याविरोधात वडवणी ठाण्याचे सपोनि सुरेश खाडे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांनी याची चौकशी करून २ वर्षे जिल्ह्यातून हद्दपार करावे, याबाबत पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्याकडे शिफारस केली. त्याप्रमाणे मंगळवारी अधीक्षकांनी या दोघांनाही वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार केले. 

निवडणुकीच्या तोंडावर कारवाई
सध्या निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. गुन्हेगार व गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्यांची पोलीस माहिती काढत आहेत. अट्टल गुन्हेगारांवर हद्दपार, एमपीडीए व मोका सारख्या कारवाया केल्या जात आहेत. अनेक आरोपींची प्रस्ताव तयार झाले असून त्यांच्यावरही लवकरच कारवाई होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

Web Title: Two bike theft exile from Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.