दोन भाजपकडे, एक राष्ट्रवादी तर एक संमिश्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:34 AM2021-01-19T04:34:59+5:302021-01-19T04:34:59+5:30

धारुर : तालुक्यातील जहांगिरमोहा, रुईधारूर, भोपा व कासारी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. राष्ट्रवादी ...

Two BJP, one Nationalist and one Composite | दोन भाजपकडे, एक राष्ट्रवादी तर एक संमिश्र

दोन भाजपकडे, एक राष्ट्रवादी तर एक संमिश्र

Next

धारुर : तालुक्यातील जहांगिरमोहा, रुईधारूर, भोपा व कासारी ग्रामपंचायत निवडणुकीत दोन ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात एक तर एका ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र उमेदवार निवडून आले.

तालुक्यात पाच ग्रामपंचायतींपैकी कोथींबीरवाडी ग्रामपंचायतबिनविरोध झाली होती. तर चार ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले. मतदारानी जुन्यांना डावलून नविन तरुणांना संधी दिली असून तीन ठिकाणी परीवर्तन झाले आहे.

जहागिरमोहा ग्रामपंचायतीच्या प्रभाग एकमध्ये बंडू बाबूराव कोंबडे ३५० मतांनी विजयी झाले. आशाबाई संजय कांदे यांना ३५२ मते मिलाली. रुक्मिनबाई अभिमान शिंदे ३०३ मते घेऊन विजयी झाल्या. प्रभाग दोन मधुन रब्बानी अब्दुल रहमान ३२२ मते घेत विजयी झाले. शिवकन्या वसूदेव बिल्पे यांनी ४०२ मते मिळवत विजय संपादन केला. प्रभाग तीनमध्ये तुळसाबाई बाजीराव राठोड ३२६ मते घेऊन विजयी झाल्या.

भोपा ग्रामपंचायतच्या प्रभाग एकमध्ये रविराज प्रभाकर चाटे १७८, प्रविण इंद्रजीत वाघचौरे १७८, मिराबाई अशोक वाघचौरे यांनी १८६ मते घेत विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये गोंविद प्रकाश गायकवाड यांनी २१६, सुरेखा अंकूश तिडके १८९, संगीत ईश्वर वाघचौरे यांनी २०४ मते घेत विजय प्राप्त केला. प्रभाग तीनमधून सुग्रिव ज्ञानोबा वाघचौरे(१८२),मिना गणेश पट्टेकर (२००), शेख आयशा मन्सूर (१४१ मते) विजयी झाले.

रुई धारूर ग्रामपंचायतच्या प्रभाग एकमधून भागवत नाना गिरी (२९३), अर्चना बालासाहेब सोळंके(३३४) हे विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये काशिनाथ गोविंद गायकवाड(२४०), बालासाहेब श्रीराम सोळंके(२५४), मनीषा दिनकर तिडके (२७२) हे विजयी झाले. प्रभाग तीनमधून गणपती दामोदर नांदुरे(२९९),प्रभावती मदन गायकवाड(३३०), सुनिता विजय राठोड(३३७) हे विजयी झाले. कासारी ग्रामपंचायतच्या प्रभाग एकमध्ये सिद्राम कोंडीबा सोनवणे(२७१), सदाशिव महादेव बडे (३२६), अप्रोगाबाई सुंर्यकांत बडे (३३९) विजयी झाले. प्रभाग दोनमध्ये सुनंदा महादेव बडे (३६३), बाबासाहेब आश्रूबा बडे (३३२), अलका नामदेव घुले (३५०) हे विजयी झाले. प्रभाग तीनमधून सय्यद सुभान रमु (३२४), राणीबाई ज्ञानोबा बडे(३८९),सत्यभामा नामदेव बडे(३४८) विजयी झाले. प्रभाग चारमधून पुजा धम्मपाल उघडे(१७३), गिराजबाई जाधव गिराजबाई प्रभू (१६६) विजयी झाले. विजयी उमेदवारांना मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली होती. निवडणूक विभागाचे नियोजन नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी केले होते तसेच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक सुरेखा धस यांनी ठेवला होता.

Web Title: Two BJP, one Nationalist and one Composite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.