भोगलवाडीच्या दोन भावांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:18+5:302021-02-26T04:47:18+5:30
सदर चाचणी स्पर्धा २४ फेब्रुवारी २०२१ रोजी आहेर चिंचोली, ता. बीड येथे घेण्यात आली. गणेश व सुरज या ...
सदर चाचणी स्पर्धा २४ फेब्रुवारी २०२१ रोजी आहेर चिंचोली, ता. बीड येथे घेण्यात आली. गणेश व सुरज या दोन्ही मुंडे बंधूंनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ओपन गटातून सहभाग घेतला होता. यात दोघांनीही आपल्या प्रतिस्पर्धी मल्लास आस्मान दाखवत आगामी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या व सर्व महाराष्ट्रासाठी लक्ष्यवेधक ठरणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ओपन गटातून बीड जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान या मुंडे बंधूंमुळे बीड जिल्ह्यास मिळाला आहे.
गणेश व सूरज हे दोघे सख्खे चुलत भाऊ असून, त्यांना लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. त्यातच सूरजचे वडील जालिंदर आबा मुंडे हे जुने पहिलवान असून, त्यांचे स्वत:चे शाहू कुस्ती केंद्र कोल्हापूर येथे आहे. या कुस्ती केंद्राचे मोठे नाव कोल्हापूर जिल्ह्यात आहे. हे दोघेही याच कुस्ती केंद्राच्या तालमीत व वस्ताद जालिंदर आबा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले मल्ल आहेत. भोगलवाडीसारख्या डोंगरदऱ्यातील हे दोन मल्ल महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ओपन गटातून बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने त्यांच्यामुळे भोगलवाडीसह धारूर तालुक्याचे नाव राज्यभर गाजणार आहे. याबद्दल गणेश बळीराम मुंडे व सूरज जालिंदर मुंडे या दोन भावांवर भोगलवाडीसह धारूर तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
===Photopath===
250221\img-20210225-wa0121_14.jpg