केज तालुक्यातील दोघे भाऊ तुळजापूर जवळ झालेल्या अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 05:07 PM2018-11-22T17:07:05+5:302018-11-22T17:08:22+5:30
केज तालुक्यातील बेंगळवाडी येथील दोन तरुणांचा तुळजापूर येथे अपघातात जागीच मृत्यू
केज (बीड ) : केज तालुक्यातील बेंगळवाडी येथील दोन तरुणांचा तुळजापूर येथे अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. राजू पवार व रंगनाथ देवगुडे असे मृतांची नावे असून ते मावसभाऊ होते.
तालुक्यातील विडा गावापासून सात किमी अंतरावर असलेल्या बेंगळवाडी येथील रहिवासी राजू पवार व रंगनाथ देवगुडे हे मावसभाऊ तुळजापूर येथे जेसीबी ऑपरेटर म्हणून काम करत होते. बुधवारी जेसीबी नादुरुस्त झाल्यामुळे ते दोघेही मोटारसायकल वर जेसीबीचे सामान आणण्यासाठी सायंकाळी ५ च्या सुमारास सोलापूर ला निघाले होते. तुळजापूर पासून काही अंतरावर गेले असता कर्नाटक राज्यातील एका ट्रक ने पाठीमागून भरधाव वेगात मोटारसायकल ला धडक दिली. यामध्ये एकाचा जागीच तर एका भावाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सदरील घटना समजल्यानंतर कारखान्याला उसतोडणीसाठी गेलेले राजुचे आई वडील सोलापूरला पोहोचले व प्रेत ताब्यात घेऊन गावी घेऊन आले. अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून दोघा भावांच्या दुर्दैवी मृत्यू ने गावावर शोककळा पसरली आहे.