पिंपळनेर येथे दोन घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:25 PM2020-02-26T23:25:43+5:302020-02-26T23:26:09+5:30

तालुक्यातील पिंपळनेर येथे चोरट्यांनी दोन घरफोड्या करून १ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

Two burglaries at Pimplener | पिंपळनेर येथे दोन घरफोड्या

पिंपळनेर येथे दोन घरफोड्या

Next
ठळक मुद्देसोने, रोख रक्कम लंपास : श्वानपथक, विशेष पथकाची भेट

बीड : तालुक्यातील पिंपळनेर येथे चोरट्यांनी दोन घरफोड्या करून १ लाख ७४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
चोरट्यांनी पहटेच्या सुमारस गावात प्रवेश करत आजूबाजूच्या घरांना कडी लाववली. व त्यानंतर पिंपळनेर येथील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा. उमेश सोनटक्के यांच्या व शेजारी राहणाºया केळगंद्रे यांच्या घरी चोरट्यांनी सोने व रोख रक्कम लंपास केली. चोरी झाली त्यावेळी सोनटक्के यांच्या आई घरी एकट्याच झोपल्या होत्या दरम्यान दोन खोल्या असल्यामुळे एकाला कुलूप लावलेला होता. दरम्यान चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात असलेले कपाट उघडेच लॉक नव्हते, त्यांनी त्यामधील सोने व रोख रक्कम लंपास केली.
त्यानंतर त्यांनी सोनटक्के यांच्याच शेजारी राहणाºया केळगंद्रे यांच्या घराकडे मोर्चा वळवला. मनोहर केळगंद्रे व त्यांची पत्नी हे शेतात झोपण्यासाठी गेले होते. त्यावेळी घराला कुलूप पाहून चोरट्यांनी ते तोडले व घरात प्रवेश केला. त्यामधून देखील चोरट्यांनी सोने व रोख रक्कम लंपास केली. दरम्यान दोन्ही चोरीतील मुद्देमाल मिळून १ लाख ७४ हाजार २०० रुपये आहे. ही घटना पाहटे ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना समजली. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि शरद भुतेकर, साईराम पवार, पोह अरूण आवचार, राम खेत्रे, पोना.शरीफ शेख यांनी भेट दिली व घटनेचा पंचनामा केला.याप्रकरणी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पवार हे करत आहेत.

Web Title: Two burglaries at Pimplener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.