दोन काेरोनाबळी; ५५ नवे रुग्ण तर ५३ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:38 AM2021-09-12T04:38:59+5:302021-09-12T04:38:59+5:30

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शंभरच्या खाली आल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर झाली आहे, पण मृत्यू रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर ...

Two carotenoids; 55 new patients and 53 coronal free | दोन काेरोनाबळी; ५५ नवे रुग्ण तर ५३ कोरोनामुक्त

दोन काेरोनाबळी; ५५ नवे रुग्ण तर ५३ कोरोनामुक्त

Next

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शंभरच्या खाली आल्याने तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर झाली आहे, पण मृत्यू रोखण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील २ हजार ३६८ जणांची तपासणी करण्यात आली. त्याचे अहवाल शनिवारी मिळाले. यात २ हजार ३१३ निगेटिव्ह तर ५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ५, आष्टी १९, बीड ४, धारुर ४, गेवराई २, केज ९, माजलगाव २, परळी २, पाटोदा ३, शिरुर १ व वडवणी तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. तसेच दोन रुग्णांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आता एकूण बाधितांची संख्या १ लाख १ हजार ८९४ इतकी झाली असून, पैकी ९८ हजार ६४८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. २ हजार ७२९ जणांचा बळी गेला आहे. सध्या ५१७ रुग्ण उपचाराखाली आहेत.

Web Title: Two carotenoids; 55 new patients and 53 coronal free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.