जिल्हा रुग्णालयात दुर्बिणद्वारे पहिल्यांदाच दोन गंभीर शस्त्रक्रिया यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:41 AM2021-09-16T04:41:35+5:302021-09-16T04:41:35+5:30
बीड : येथील जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर जुन्या इमारतीत होताच दुर्बिणीद्वारे दोन गंभीर शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वी करण्यात आल्या आहेत. जिल्हा ...
बीड : येथील जिल्हा रुग्णालयाचे स्थलांतर जुन्या इमारतीत होताच दुर्बिणीद्वारे दोन गंभीर शस्त्रक्रिया पहिल्यांदाच यशस्वी करण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी स्वत: शस्त्रक्रिया केली. तसेच रूग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिकांनीही या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दिवसेंदिवस सुविधा व उपचार दर्जेदार मिळत असल्याच्या भावना सामान्यांमधून व्यक्त केला जात असून विश्वासही वाढत आहे.
बीड शहरातील २० वर्षीय महिलेला ॲपेंडिक्सचा त्रास होता. याबाबत ही महिला जिल्हा रूग्णालयात आली. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी तिची तपासणी करून शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यांनीही होकार देताच १४ सप्टेंबर रोजी सकाळी या महिलेला शस्त्रक्रियागृहात घेण्यात आले. येथे खुद्द जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे उपस्थित होते. त्यांनी स्वत: ही शस्त्रक्रिया आपल्या टीमच्या सहकार्याने यशस्वी केली. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी सकाळी एका ३० वर्षीय महिलेला पित्ताशयाच्या पिशवीचा त्रास होता. तिचीही दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
---
या टीमने घेतले परिश्रम
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. अभिषेक जाधव, डॉ. माजेद, डॉ. शापे, डॉ. संदीप पाटील, डॉ. श्रीकांत मोराळे, डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, डॉ. राम आवाड, मेट्रन रमा गिरी, संगीता दिंडकर, ओटी इन्चार्ज जयश्री उबाळे, परिचारिका मिता लांबोरे, शिपाई श्रीराम माने आदींनी परिश्रम घेतले.
---
खाजगी साहित्य उपलब्ध करून या दोन्ही शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करण्यात आल्या आहेत. यापुढे गर्भपिशवी शस्त्रक्रियाही दुर्बिणीद्वारे करण्याचा संकल्प आहे. सामान्य नागरिकांचा विश्वास वाढत असल्याने काम करण्यास बळ मिळत आहे.
डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक बीड
150921\15_2_bed_7_15092021_14.jpeg
बीड