दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ नऊ लाख !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:32 AM2021-04-13T04:32:06+5:302021-04-13T04:32:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनाची चेन ब्रेक करताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही ब्रेक लागला आहे. प्रवासी नसल्याने मोजक्यास ...

In two days, 121 buses covered 42,000 km. Ran; Only nine lakhs fell into the hands! | दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ नऊ लाख !

दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार कि.मी. धावल्या; हाती पडले केवळ नऊ लाख !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनाची चेन ब्रेक करताना राज्य परिवहन महामंडळाच्या बसलाही ब्रेक लागला आहे. प्रवासी नसल्याने मोजक्यास बस धावत आहेत. त्यामुळे रापमला लाखो रुपयांचा दररोज फटका बसत आहे. मागील दोन दिवसांत विकेंड लॉकडाऊन होते. या दोन दिवसांत १२१ बस ४२ हजार किलोमीटर धावल्या आहेत. यात केवळ ९ लाख रुपये उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात रापमच्या ५१८ बस आहेत. लॉकडाऊनपूर्वी या बस धावत होत्या. यात दररोज ४० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होेते; परंतु सध्या लॉकडाऊनमुळे आणि मोजक्याच प्रवाशांना परवानगी असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे. या दोन दिवसांत केवळ ९ लाख ८ हजार रुपयांचे उत्पन्न रापमला मिळाले आहे. तर निम्मेच कर्मचारी कर्तव्यावर बोलविले जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

निम्मेच कर्मचारी कामावर

बस जागेवर असल्याने चालक, वाहक, तंत्रज्ञ आदी कर्मचारी कामावर येत नाहीत. शासनाच्या नियमावलीनुसार ५० टक्केच कर्मचारीही कार्यालयात असतात.

चालक, वाहकांना रोटेशननुसार कर्तव्यास बोलावले जात आहे. तर काहींना मुंबई बेस्टसाठी पाठविण्यात आलेले आहे. सध्या निम्मेच कर्मचारी कर्तव्यावर येत असल्याचे दिसते.

कोरोनाची चेन ब्रेक करताना तोटा

n जिल्ह्यात धावणाऱ्या बसमधून महामंडळाला दररोज सरासरी ४० लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळत होते.

n परंतु गतवर्षीपासून लॉकडाऊन सुरू झाल्याने रापम तोट्यात आहे. मध्यंतरी बस धावत असल्याने काही प्रमाणात परिस्थिती पूर्ववत होत होती; परंतु आता पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहे.

n शासनाने कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी जाहीर केलेल्या नियमावलीचा रापमच्या बसलाही फटका बसत आहे. प्रवासी नसल्याने रापम सध्या तोट्यात आहे. आजही केवळ आठ आगारांतून बोटावर मोजण्याइतक्याच बस धावत असल्याचे सांगण्यात आले.

बसची तासनतास प्रतीक्षा

प्रवासी नसल्याने बस वेळेवर निघत नाहीत. ३० प्रवासी झाल्याशिवाय बस हलणार नाही, असे चालक, वाहक सांगतात. त्यामुळे ही संख्या पूर्ण होईपर्यंत बसमध्येच तासनतास बसावे लागत आहे. यामुळे वेळ लागत असून चिडचिडेपणा वाढला आहे.

- अभिमान पंडित, प्रवासी, बीड

Web Title: In two days, 121 buses covered 42,000 km. Ran; Only nine lakhs fell into the hands!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.