दोन दिवसांवर संक्रांत..सोनसाखळी चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 12:08 AM2020-01-13T00:08:22+5:302020-01-13T00:09:52+5:30
मकरसंक्रांतीच्या सणासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग बीड तसेच इतर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तसेच सोन्याचे दागिने परिधान करतात, याच दिवसात सोनसाखळी चोरांकडून लक्ष ठेऊन चोऱ्या केल्या जातात,
बीड : मकरसंक्रांतीच्या सणासाठी काही दिवस शिल्लक आहेत. या सणाच्या निमित्ताने महिला वर्ग बीड तसेच इतर शहरातील सराफा बाजारात सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करतात. तसेच सोन्याचे दागिने परिधान करतात, याच दिवसात सोनसाखळी चोरांकडून लक्ष ठेऊन चोऱ्या केल्या जातात, अशा प्रकारे बीड शहरातील सुभाष रोड परिसरातून ९ जानेवारी रोजी एका महिलेच्या गळ््यातील सोन्याचे दागिने चोरी करण्याचा प्रयत्न दोन चोरट्यांनी केला होता. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. याप्रकरणातील दोन सोनसाखळी चोरांच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
सोनाजी अशोक जाधव (वय २७ रा. गांधीनगर, बीड ) आकाश शाम जाधव (वय २९ रा. सुभाष कॉलनी पेठ बीड) असे अटक केलेल्या सोनसाखळी चोरांची नावे आहेत. ९ जानेवारी रोजी मोनिका मंगेश लोळगे नामक महिला आपल्या मुलासोबत सुभाष रोड येथे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर सोने चोरण्याच्या उद्देशाने वरील दोन चोरट्यांनी पाळत ठेवली होती.
खरेदी झाल्यानंतर रिक्षात बसून त्या घरी जात असताना, चोरट्यांनी दुचाकीवरून त्या रिक्षाचा पाठलाग केला. त्यावेळी अचानक चोरट्यांनी त्या महिलेच्या गळ््यातील सोने चोरण्याचा प्रयत्न केला.दरम्यान महिलेने आरडाओरड केल्यानंतर चोरट्यांनी तेथू पळ काढला. त्यानंतर सणासुदीच्या दिवसामध्ये अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या चोरट्यांना अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु होता. याच दरम्यान १२ जानेवारी रोजी वरील दोन सोनसाखळी चोर बीड तालुक्यातील नाळवंडी नाका येथे आले असल्याची माहिती खबºयामार्फत मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांनी मोठ्या शिताफीने त्या दोन सराईत चोरांना तब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली असताना महिलेच्या गळ््यातील सोने चोरण्याचा प्रयत्न केल्याची कबुली त्यांनी दिली.
तसेच सोनसाखळी चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी देखील चोरीची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलीसी खाक्या दाखवल्यावर सणाच्या दिवसात महिलांचे दागिने यापुर्वी चोरी केल्याची देखील कबुली त्यांनी यावेळी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपाधीक्षक भास्कर सावंत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोनि भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि संतोष जोंधळे, तुळशीराम जगताप, जयसिंग वाघ, शेख नसीर, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, कैलास ठोंबरे, सतिष कातखडे, अनिल डोंगरे, शेख अन्वर, संतोष हंगे यांनी केली.
महिलांनी सावध राहावे
या दोन चोरांना अटक केल्यामुळे सोनसाखळीचे आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दोन्ही चोरांकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत. तसेच महिलांनी देखील सोन्याचे दागिने घातल्यानंतर सावध राहून असा प्रसंग घडू नये यासाठी काळजी घ्यावी, आणि घडल्यास प्रतिकार करावा व तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.