अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 11:25 AM2017-12-14T11:25:02+5:302017-12-14T18:02:11+5:30

शहरापासून जवळ असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसची समोरासमोर धडक झाली. यात एका बसचा चालक ठार झाला असून 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. 

Two dead, two injured in Ambajogai accident | अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

अंबाजोगाईजवळ दोन बसच्या अपघातात १ ठार, ३० जखमी

googlenewsNext

अंबाजोगाई (बीड) : शहरापासून जवळ असलेल्या वरवटी गावानजिक आज सकाळी ८ वाजता दोन बसची समोरासमोर धडक झाली. यात एका बसचा चालक ठार झाला असून 30 पेक्षाही अधिक प्रवाशी जखमी झाले आहेत. 

अंबाजोगाई बसस्थानकाचा थांबा पार करून पुढे निघालेली लातूर - परभणी बस (एमएच २० बीएल १६३३) वरवटी आली असता बस चालकाने अन्य एका वाहनास ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या गंगाखेड - पुणे (एमएच २० बीएल २५२१) बससोबत जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही बसच्या चालक- वाहकासहित ३० प्रवाशी जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने दुसऱ्या एका बसमधून आणि रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, लातूर - परभणी गाडीचे चालक मारूती गोपीनाथराव कातकडे (वय ४०) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. इतर जखमीत तिघे गंभीर असून उर्वरित प्रवाशांना किरकोळ मार आहे. 

बहुतांशी जखमींच्या चेहऱ्याला मार लागला आहे. जखमींमध्ये एस.व्ही आईलवाड (चालक), देवकते बाळासाहेब दिगंबर (वाहक), मनिषा मारोती साळुंके (वाहक), अयोध्या प्रकाश जाधव रा.परळी, पुजा गणपत चव्हाण रा. मोहखेड तांडा, गणपत निवृत्ती चव्हाण रा.मोहखेडा तांडा, ज्ञानेश्वर श्रीनिवास आघाव रा. सारडगाव, ता.परळी, दिलीप दिगांबर कुलकर्णी रा.लातूर, निर्मळकुमार घरमचंद शहा रा.पिंपळवाडा (राजस्थान), शेख पाशामिया आजम रा.वडवळ ता. चाकुर, विठ्ठल अर्जुन मुंडे रा.वानटाकळी, सुंदरराव मोहनराव देशमुख रा. अंबाजोगाई, गोविंद तुकाराम भाकरे रा.वानटाकळी, सुरज बापुराव तरकसे रा. सोनवळा, नारायण बलभीम चौधरी रा.सोनवळा, मनिषा नारायण चौधरी रा. सोनवळा, बालाजी नारायण चौधरी रा.सोनवळा, सुभद्रा धोंडीराम केंद्रे रा. उमराई, विनित मिश्रा रा.हैद्राबाद, प्रमोद महादेव राजमाने रा. परळी, रमेश संतराम सातपुते रा. लातूर, व्यंकटेश मोरे रा.गंगाखेड, खदीर शेख रा. परळी, अजय मधुकर देशमुख रा. परळी, राजनंदीनी धनघाव रा.गंगाखेड, भानुप्रताप रविंद्र सिंग रा. अंबाजोगाई, काशीबाई कराड रा.तांबवा यांचा समावेश आहे.
 
‘स्वाराती’ प्रशासनाची तत्परता
अपघाताची माहिती मिळताच रुग्ण पोहोचण्यापूर्वीच अंबाजोगाई येथील ‘स्वाराती’ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि अधीक्षक डॉ. सिद्धेश्वर बिराजदार हे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या संपूर्ण टीमसह सज्ज झाले होते. जखमींना आणताच तातडीने त्यांच्यावर उपचार झाल्याने अनेकांचा जीव वाचला. अधिष्ठाता आणि अधीक्षक यांच्या देखरेखीखाली डॉ. विजय बुरांडे, डॉ, सुधीर भिसे, डॉ. सतीश गिरेगोईनवाड, डॉ. नितीन चाटे, डॉ. राकेश जाधव, डॉ. अविनाश काशीद, डॉ. अमित लोमटे तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि  सर्व स्टाफने तत्पर उपचारासाठी परिश्रम घेतले. जखमींच्या घरी दूरध्वनीवरून माहिती देण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. आपत्तीच्या वेळी नेहमीच स्वारातीमधील स्टाफचे नेहमीचे ‘टीमवर्क’ यावेळेसही पहावयास मिळाले.
.

Web Title: Two dead, two injured in Ambajogai accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.