बीड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये आढळले डेंग्यूचे १८ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:09 AM2019-12-29T00:09:37+5:302019-12-29T00:10:40+5:30

डिसेंबर महिन्यात ढगाळ, थंडी व उनाचे वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच घाणीचे साम्राज्याचाही परिणाम जाणवू लागला आहे. या महिन्यात तब्बल १८ डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत.

Two dengue patients were found in Beed district in December | बीड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये आढळले डेंग्यूचे १८ रुग्ण

बीड जिल्ह्यात डिसेंबरमध्ये आढळले डेंग्यूचे १८ रुग्ण

Next
ठळक मुद्देआरोग्य विभाग कामाला । वातावरण बदलामुळे इतर आजारही बळावले

बीड : डिसेंबर महिन्यात ढगाळ, थंडी व उनाचे वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच घाणीचे साम्राज्याचाही परिणाम जाणवू लागला आहे. या महिन्यात तब्बल १८ डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभाग कामाला लागला आहे.
मागील आठ दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. दोन दिवसांपासून तर गारठा वाढला आहे. त्यातच थंड वाऱ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. डिसेंबर महिन्यात तब्बल १८ डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. या सर्वांवर सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. इतर आजारांचे रुग्णही उपचार घेत आहेत.
दरम्यान, नगर पालिका, ग्राम पंचायतकडून वेळच्यावेळी स्वच्छता होत नाही. तसेच नागरिकही आपल्या स्वच्छतेबाबत काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळेच साथ रोग वाढत चालले आहेत. खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावर उपाययोजना म्हणून आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाणीसाठ्यांत सोडले गप्पी मासे
साथरोग नियंत्रणासाठी पाणी साठ्यांमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले आहेत. तसेच धुर फवारणी, अबेटींग करण्याची कारवाईही केली जात आहे. शहरांच्या ठिकाणी मासे मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले होते. याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनीही घेतला होता.

वातावरणातील बदल आणि घाणीच्या साम्राज्यामुळे रुग्ण संख्या वाढली आहे. आलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. तसेच त्यांना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शनही केले जाते. आजाराची लक्षणे जाणवू लागताच नागरिकांनी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
- डॉ.आशिष कोठारी
वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय बीड

Web Title: Two dengue patients were found in Beed district in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.