माजलगावात चोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:20 PM2018-05-26T23:20:07+5:302018-05-26T23:20:07+5:30

माजलगाव शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाºया चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन टोळ्यांमधील चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून अद्याप दोघे फरार आहेत.

Two gangs of robbery and robbery in Majalgaon | माजलगावात चोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड

माजलगावात चोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड

Next
ठळक मुद्देचार अटकेत, दोन फरार : माजलगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये होती दहशत

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : शहरासह तालुक्यात धुमाकूळ घालणाºया चोरट्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दोन टोळ्यांमधील चार चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असून अद्याप दोघे फरार आहेत. जेरबंद झालेल्या चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे. अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात त्यांना यश आले.

जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गेवराई, माजलगाव आणि अंबाजोगाई उपविभागात याचे प्रमाण अधिक होते. यात माजलगाव तालुक्यात तर रोजच चोरी, घरफोडी होत होत्या. त्यामुळे अख्खे पोलीस दल परेशान होते. रात्रीची गस्त वाढविण्याबरोबरच नागरिकांना जागरूक राहण्यासंदर्भात आवाहन केले जात होते. उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके या स्वत: गस्त घालत होत्या. तसेच स्थानिक गुन्हे शाखा, माजलगाव शहर, ग्रामीण व इतर विशेष पथकांनाही गस्त घालून सतर्क राहण्याच्या सूचना नवटके यांनी दिल्या होत्या. या चोºयांचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.

नवटके यांनी हे आव्हान पेलले. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली. त्यांना शहरातील घरफोड्या करणारे हे माजलगावातीलच रहिवासी असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावला आणि चार जणांच्या टोळीतील दगड्या गायसमुद्रे (माजलगााव) याला शुक्रवारी रात्री बेड्या ठोकल्या. त्याचा ‘पाहुणचार’ करताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने गुन्हे कबुल करीत साथीदार व टोळीचा म्होरक्या दिपक कांबळे (माजलगाव) सह अन्य दोघांची नावे सांगितली. दोघे ताब्यात असून आणखी दोघांचा शोध घेतला जात आहे.

तर ग्रामीण भागात चोºया करणारे हे माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील असल्याचे समजले. ही तीन चोरांची टोळी होती. त्यापैकी विनोद व लंबºया चव्हाण या दोन भावांना पकडण्यात यश आले तर एक अद्यापही फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, वैभव कलुबर्मे, डीवायएसपी भाग्यश्री नवटके, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि दिलीप तेजनकर, पोउपनि विकास दांडे, भालेराव, घोडके, सोनवणे, केळकेंद्र्रे, गादेवर, देशमुख, कांबळे, कुवारे, वाघमारे, चव्हाण, रूपनर आदींनी केली.

Web Title: Two gangs of robbery and robbery in Majalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.