जुन्या भांडणातून दोन गट समोरासमोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:29+5:302021-08-19T04:37:29+5:30

बीड : जुन्या भांडणातून दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही घटना १७ ऑगस्टला दुपारी पावणेतीन वाजता पेठ बीडमधील ...

Two groups face off from an old quarrel | जुन्या भांडणातून दोन गट समोरासमोर

जुन्या भांडणातून दोन गट समोरासमोर

Next

बीड : जुन्या भांडणातून दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. ही घटना १७ ऑगस्टला दुपारी पावणेतीन वाजता पेठ बीडमधील खडकपुरा भागात घडली. परस्परविराेधी तक्रारीवरून १५ जणांवर गुन्हा नोंद झाला.

फिजानखान जुनेदखान जहाँगीर (२१,रा.भालदारपुरा, बीड) याच्या तक्रारीवरून जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याच्यावर चाकूहल्ला केला. त्यानंतर लोखंडी रॉडनेही मारहाण केली. त्यात फिजानखान हा जखमी झाला. या प्रकरणी सफानखान महेबूब खान, अमानखान नासेरखान, शानखान समीर खान, महेबूब खान खाजा खान, समीर खान करीम खान, नासेरखान खाजाखान यांच्यावर गुन्हा नाेंद करण्यात आला. अमानखान नासेरखान पठाण (१९) याच्या तक्रारीनुसार, आमच्यावर केसा का केली, अशी कुरापत काढून घर, दुचाकी व सोलार पाईपवर दगडफेक करून एक लाख ७० हजार रुपयांचे नुकसान केले. पाठीत दगड मारून तसेच कानशिलात लगावून शिवीगाळ केली. फिजानखान जहागीरदार, शेख रियाज, शेख सर्फराज शफ्फुदाद,जुबेरखान जहागीरदार,जुनैदखान जहागीरदार, माजेदखान जहागीरदार, साजेदखान ऊर्फ लड्डनखान, एजाजखान ऊर्फ अड्डूू खान, शेख नवाज, शेख फयाज, उमरखान जहागीरदार, शेख अब्दुल सलाम, शहानवाज जहागीरदार,मुजाहिद जहागीरदार, अफ्रिदीखान जहागीरदार,अरबजखान जहागीरदार,फरदीनखान जहागीरदार,नेहालखान जहागीरदार,अबरारखान जहागीरदार यांच्यावर पेठ बीड ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. उपनिरीक्षक जी. एच. पठाण व हवालदार दादा उबाळे तपास करत आहेत.

Web Title: Two groups face off from an old quarrel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.