परळीजवळ टेम्पो, दुचाकी अपघातात दोन ठार, चार कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:09+5:302021-09-09T04:41:09+5:30
८ सप्टेंबर रोजी परळी - अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडीजवळ सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ए. जी. कन्ट्रक्शन ...
८ सप्टेंबर रोजी परळी - अंबाजोगाई महामार्गावर कन्हेरवाडीजवळ सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
ए. जी. कन्ट्रक्शन या कंपनीचा परळी - अंबाजोगाई मार्गावरील घाटमाथ्यावर प्रकल्प आहे. तेथे मजूर कामानिमित्त असतात. ८ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास येथील काही कामगारांना घेऊन मिनी टेम्पो (एमएच ४४ - ७६६०) निघाला तर दोन कामगार तेथूनच (दुचाकी एमएच २३ जे ५२७५) वर टेम्पोसोबत परळीकडे कामावर जाण्यासाठी निघाले. कन्हेरवाडीजवळील उतारावर चालकाचा ताबा सुटला व टेम्पो दुचाकीवर आदळला. यात एक कामगार जागीच ठार झाला, तर चाैघे जखमी झाले. जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयतांची ओळख पटविण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही अपघातग्रस्त वाहने ठाण्यात आणून लावली.