कारच्या अपघातात महिलेसह दोघे ठार, अंबाजोगाईतील घटना
By अनिल लगड | Updated: March 20, 2023 00:41 IST2023-03-20T00:40:00+5:302023-03-20T00:41:10+5:30
अंबाजोगाई- भरधाव वेगातील कार पलटी झाल्याने एक महिला आणि एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली ...

कारच्या अपघातात महिलेसह दोघे ठार, अंबाजोगाईतील घटना
अंबाजोगाई- भरधाव वेगातील कार पलटी झाल्याने एक महिला आणि एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली ते पूस दरम्यानच्या महामार्गावर आज रविवारी (दि.१९) रात्री १० वाजताच्या सुमारास झाला.
महेश विष्णू कटारे (वय ३२, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो व्यवसायाने चालक असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. मयत महिलेची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. दोघांचेही मृतदेह स्वाराती रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, हा अपघात नेमका कसा झाला याबाबत निश्चित माहिती अद्याप मिळालेली नाही.